मुबंई
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची एका लग्न सोहळ्यात भेट झाली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाल्याची माहिती समोर झाली आहे. खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नात संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान झाले होते. संजय राऊत यांनी स्वत: सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. या आजारावर उपचार करण्यासाठी संजय राऊत यांनी काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही सांगितले होते. परंतु, संजय राऊत यांची प्रकृती अपेक्षेपेक्षा लवकर सुधारत असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबईतील एका संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाहसोहळा होता. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित आहे. यावेळी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांशी चर्चा केल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी, संजय राऊतांची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले होते. ते लवकरच राजकारणात पुन्हा सक्रिय होतील, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यानंतर संजय राऊत हे घरात राहूनच सोशल मीडियावरुन राजकीय घडामोडींवर भाष्य करताना दिसून आले होते. आज मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील आज संजय राऊत यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.


