अहिल्यानगर/प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बी पिकांची आजमितीस २,५७,६८० हेक्टरवर ५७% पेरणी पूर्ण झाली आहे.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती नुसार या वर्षीच्या रब्बी हंगामात पाणी मुबलक आहे पण पेरणीला मात्र उशीर झालेला आहे.
*जिल्ह्यात ज्वारीने घेतली आघाडी…
जामखेड, कर्जत व पारनेर तालुक्यात ज्वारी पेरणीला सर्वाधिक पसंती आहे.जिल्हात ज्वारीची ६३.९९% पेरणी पूर्ण झालेली आहे.
इतर प्रमुख पिके ५०% पेक्षा जास्त आहेत.त्यात मका (५८.५७%),हरबरा (५३.८७%),गहू (५१.५४%).
अतिवृष्टीमुळे थांबलेली पेरणी आता वेगात सुरू असून ३० डिसेंबरपर्यंत पेरणीचा कालावधी आहे.!


