Wednesday, June 24, 2026

बालिका दिनी ‘मी सावित्री बोलते’ नाटिकेचे सादरीकरण

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील जेऊर रस्त्यावरील फुलारी वस्ती वरील श्रीसंत सावता महाराज मंदिर प्रांगणात दि.३ रोजी सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती साजरी करण्यात आली. कु.श्रेया अक्षय रसाळ या ८ वर्षीय बालिकेने सावित्रीबाईंच्या वेशभुषेत “मी सावित्रीबाई फुले बोलते”
ही एक पात्री नाटिका सादर केली.

भेंडा येथील श्रीसंत शिरोमणी सावता महाराज सेवा मंडळाचे वतीने
स्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती व
बालिका दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी श्रेया अक्षय रसाळ हिने सावित्रीबाईंच्या वेशभूषा मध्ये ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’
या एक पात्री नाटिकेच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले शिक्षण,आयुष्यात भोगलेल्या यातना, त्याचा समाजातील महिलांना झालेला सकारात्मक व दृश्य परिणाम यावर उत्कृष्टपणे सादरीकरण केले.

कु.प्रगती फुलारी, ज्ञानेश्वरी फुलारी , भाग्यश्री फुलारी,यशस्वी फुलारी,पीयूष फुलारी,दादाराम फुलारी, दत्तात्रय काळे, कारभारी गरड,डॉ.शिवाजी शिंदे, डॉ.संतोष फुलारी,अजित रसाळ,संदीप फुलारी, संदीप जावळे,राजू जावळे, शिवाजी फुलारी, बाळासाहेब फुलारी, सुरेश जावळे, राजेंद्र फुलारी, प्रदीप फुलारी आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!