Sunday, March 29, 2026

राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानच्या ग्रंथभेट योजनेसाठी पुस्तके सादर करण्याचे आवाहन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ‘ग्रंथभेट’ योजनेअंतर्गत सन २०२५ या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेले मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करून राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येतात. या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रंथांची निवड करण्यासाठी, तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरून प्रसिद्ध होणाऱ्या ‘शासनमान्य ग्रंथ निवड यादीमध्ये’ समावेश होण्याच्या दृष्टीने सर्व लेखक, प्रकाशक यांनी दि.२८ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत ग्रंथ पाठविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

अधिक माहिती देतांना श्री.गाडेकर म्हणाले की, सन २०२५ या कॅलेंडर वर्षात (दि. १ जानेवारी, २०२५ ते दि. ३१ डिसेंबर, २०२५) प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामूल्य प्रत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दि. २८ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेसाठी सन २०२५ या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असतील, तर पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.

मुद्रण व नोंदणी अधिनियम, १८६७ अन्वये मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, १९५४ अन्वये प्रकाशकाने सदर ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे व शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. ग्रंथ पोहोचल्याची पोचपावती संबंधित ग्रंथालयांकडून घ्यावी. ग्रंथालय संचालनालयास संबंधित ग्रंथ पाठविताना वरीलप्रमाणे ग्रंथ पाठविल्याची पोचपावती ग्रंथांसोबत टपालामार्फत वा समक्ष पाठविण्यात यावी, असेही कळविण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!