Sunday, March 29, 2026

अजितदादांच्या अस्थींचे प्रवरासंगम येथे गोदावरीत विसर्जन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थिकलश आज सोमवारी दि.२ रोजी सांयकाळी ५ वाजता नेवासा तालुक्यात दाखल झाला.कार्यकर्त्यांच्या दर्शना नंतर श्रीक्षेत्र प्रवरासंगम (ता.नेवासा) येथील गोदावरी-प्रवरा नदीचा संगम असलेल्या गोदावरी नदीत अस्थी विसर्जन करण्यात आल्या.

जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे हस्ते दादांच्या अस्थींचे वैदिक मंत्रोच्चारात व शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करून अस्थी विसर्जन करण्यात आले.

राजेंद्र नागवडे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अशोक सावंत, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुलभैया शेख,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे,राष्ट्रवादीचे नेवासा तालुका कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ, प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, भाऊसाहेब कांगुणे,ताहीर पटेल आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!