नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच, सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने ९ फेब्रुवारी पासून या सर्व ग्रामपंचायतीवर आठ तारखेला प्रशासक राज सुरू झाले आहे.
पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय लखवाले यांनी।महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम १५१ नुसार ग्रामपंचातीवर प्रशासकांची नेमणुक केली आहे.
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने घेतलेला नसल्याने मागील आठवड्यात मंत्रिमंडळाने अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा अध्यादेश काढलेला आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होईपर्यंत ग्रामपंचायतींवर प्रशासक राज आले आहे.
ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणुन नेमणूक केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे नियुक्ती गाव व कंसात प्रशासकाचे नाव असे…
बेलपिंपळगांव (श्री.बी. ए. कासार,विस्तार अधिकारी कृषी),
बहिरवाडी (श्री.बी. ए.कासार विस्तार अधिकारी,कृषी),बाभुळखेडे(श्री. जी. पी. सवाई,कनिष्ठ अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स.नेवासा),
ब-हाणपुर (श्री. ए. एस. दहातोंडे,कनिष्ठ अभियंता जि.प.ल.पा. उपविभाग, पं.स.नेवासा),
बेल्हेकरवाडी(श्री. ए. ए. सोलाट, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),बकुपिंपळगांव (श्री. ए. व्हि. इंगळे,विस्तार अधिकारी), भेडा बुद्रुक (श्री. जी. पी. सवाई,कनिष्ठ अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),भालगांव(श्री. आर. ओ. ठाकरे,विस्तार अधिकारी (सां.) ए.बा. वि.से.यो. कार्यालय),चांदा (श्री.एस.एस. माहडुंळे,कनिष्ठ अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),दिघी(श्री. पी. जी. वाघ,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जि.प.सा.बा. उपविभाग, पं. स. नेवासा), देवगांव(श्री. जी. डी. व्यवहारे,विस्तार अधिकारी), देवसडे(श्री. व्हि. आर. तागड,कनिष्ठ अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),गळनिंब (श्री. जी. व्हि. मते,कनि. प्रशासन अधिकारी), गेवराई (श्री. एस. एस. सोनवणे,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जि.प.ल.पा. उपविभाग.पं.स. नेवासा),
गोणेगांव (श्री. पी.जी. वाघ,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जि.प.सा.बा. उपविभाग.पं.स. नेवासा), गोंडेगांव(श्री. व्हि.ई. सुडके,कृषी अधिकारी पं.स. नेवासा), घोगरगांव(श्री. ए. व्हि. इंगळे,विस्तार अधिकारी),जेऊर हैबती(श्री. एस. एस. सोनवणे,
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जि.प.ल.पा. उपविभाग, पं.स. नेवासा), जळके खुर्द (श्री.जे. जे. पट्टे,शाखा अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),जळके बुद्रुक (श्री. ए. व्हि. इंगळे,विस्तार अधिकारी), कुकाणा(श्री. एन.डी. पाखरे,विस्तार अधिकारी),कारेगांव(श्री. ए. एस. दहातोंडे,कनिष्ठ अभियंता जि.प.ल.पा. उपविभाग, पं.स. नेवासा),
खेडले परमानंद(श्री. आर.एल. लांडे,
विस्तार अधिकारी कृषी),खडका(श्री. आर.एल. लांडे,विस्तार अधिकारी कृषी),खरवंडी (श्रीम. एस.एन. चव्हाण,विस्तार अधिकारी पं.),
लोहगांव(श्री. यु. बी. शिंदे, विस्तार अधिकारी कृषी),लांडेवाडी(श्री. पी.जी. वाघ,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जि.प.सा.बा. उपविभाग, पं. स. नेवासा),म्हाळस पिंपळगांव (श्री.एस.एस. माहडुंळे,कनिष्ठ अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग.पं.स. नेवासा), मक्तापुर(श्री. एस. व्हि. कळमकर,विस्तार अधिकारी.शिक्षण),मंगळापुर(श्री. आर. आर. कडु,केंद्र प्रमुख गटशिक्षण कार्यालय पं.स. नेवासा),मुरमे(श्री. व्हि.आर. तागड,कनिष्ठ अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),मोरेचिंचोरा(श्री. व्हि.ई. सुडके,कृषी अधिकारी पं.स. नेवासा),
मांडेगव्हाण(श्री. पी. के. चव्हाण,
कनिष्ठ अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),निंभारी (श्रीम. एस.एन. चव्हाण,विस्तार अधिकारी पं.),नजिकचिंचोली(श्री. आर ए. कुरहे,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),नारायणवाडी(श्री. ए. ए. सोलाट,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),निपाणी निमगांव(श्री. यु. बी. शिंदे,विस्तार अधिकारी (कृषी),नविन चांदगांव(श्री. एस. एस. भदगले,
सहा. प्रशासन अधिकारी),पाचुंदा(श्री. व्हि.ई. सुडके,कृषी अधिकारी पं.स. नेवासा),प्रवरासंगम(श्री.ए. व्हि. इंगळे,
विस्तार अधिकारी (पं.), पिंप्रीशहाली(श्री. एस. एच. कदम,विस्तार अधिकारी (सां.),
पुनतगांव(श्री. बी. ए. कासार,विस्तार अधिकारी कृषी), रांजणगांव(श्री. ए. एस. दहातोंडे,कनिष्ठ अभियंता जि.प.ल.पा. उपविभाग, पं.स. नेवासा),रामडोह(श्री. एस. एच. कदम,विस्तार अधिकारी (सां.), सुरेगांव गंगा(श्री. आर. ओ. ठाकरे,
विस्तार अधिकारी (सां.) ए.बा. वि.से.यो. कार्यालय), सलाबतपुर(श्री.जे. जे. पट्टे,शाखा अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं. स. नेवासा),शिंगणापुर(श्री.बी. ए. कासार,विस्तार अधिकारी कृषी),
सोनई(श्री.एस.एस. माहडुंळे,कनिष्ठ अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),शिंगवे तुकाई(श्री. जी. पी. सवाई,कनिष्ठ अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),सुलतानपुर(श्री. ए. एस. दहातोंडे,कनिष्ठ अभियंता जि.प.ल.पा. उपविभाग, पं.स. नेवासा),
टोका (श्री. ए. व्हि. इंगळे,विस्तार अधिकारी (पं.),तेलकुडगांव(श्री. एस. एच. कदम,विस्तार अधिकारी (सां.),
तरवडी(श्री. पी.जी. वाघ,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),उस्थळ दुमाला(श्री. एस. एस. भदगले,
सहा.प्रशासन अधिकारी),उस्थळ खालसा(श्री. आर. ओ. ठाकरे,
विस्तार अधिकारी (सां.) ए.बा. वि.से.यो. कार्यालय),वाटापुर(श्री. एस. एम. शेळके,केंद्र प्रमुख गटशिक्षण कार्यालय पं.स. नेवासा),वांजोळी(श्री. व्हि.ई. सुडके,कृषी अधिकारी पं.स. नेवासा),वरखेड( श्री. व्हि.आर. तागड,कनिष्ठ अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा),वाकडी( श्री. व्हि.आर. तागड,कनिष्ठ अभियंता जि.प.सा.बा. उपविभाग, पं.स. नेवासा)
आदेशामधील सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी आपल्या पदाचे मूळ कामकाज सांभाळून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ व महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ व त्यांच्या अनुषंगाने सर्व नियम, अधिनियम, अधिसूचना, शासननिर्णय व परिपत्रके मधील तरतुदीनुसार आपणांस नेमून दिलेल्या ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणून कामकाज करावे. तसेच आपण कर्तव्य पार पाडताना झालेल्या गैरवर्तणूक अथवा कर्तव्यात दुर्लक्ष केलेले आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे
गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी आदेशीत केले आहे.
प्रशासक नियुक्तीने ग्रामपंचायत पदाधिकऱ्यांचे अधिकारी संपुष्टात आल्याने विकासात्मक व आर्थिक अधिकार प्रशासकाकडे असणार आहेत. या काळात पाणीपट्टी-घरपट्टी वसुलीसह विकास कामे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणीकडे प्रशासकाला लक्ष द्यावे लागणार आहे.
*दोन वर्षांपासून प्रशासक असलेली गावे….
खामगाव, अंतरवली, खेडले काजळी, बेलपांढरी, लोहरावाडी, लेकुरवाळी आखाडा, चिलेखनवाडी, महालक्ष्मी हिवरे, धनगरवाडी, नेवासा बुद्रुक, गिडेगाव, नांदूरशिकारी, पाथरवाला, गोपाळपूर, राजेगाव, गोगलगाव, शिरसगाव, सुकळी खुर्द, गोमाळवाडी, तामसवाडी, गणेशवाडी, बडुले, वंजारवाडी, घोडेगाव, झापवाडी, जायगुडे आखाडा.


