Thursday, June 25, 2026

पत्रकार राजीव खांडेकर,डॉ.रंगनाथ पठारे,डॉ.धामणे कृतज्ञता’ पुरस्काराने सन्मानीत

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी:15 फेब्रुवारी:माय महाराष्ट्र न्यूज: नेवासा तालुक्यातील सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जेष्ठ पत्रकार एबीपी माझाचे राजीव खांडेकर,साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे, माउली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे यांना ‘कृतज्ञता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ. संदीप वासलेकर जागतिक परिषदेमुळे उपस्थित राहू शकले नाही.

रविवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सांयकाळी मुळा पब्लिक स्कुलच्या प्रांगणात झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.प्रास्ताविक भाषणात त्यांनी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी केलेल्या नेत्रदान, गाव तेथे मोफत वाचनालय व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वृक्षारोपण चळवळीची माहिती दिली.
कार्यक्रमास तेलंगणा राज्यातील पूर्व हैदराबादचे पोलिस आयुक्त महेश भागवत, कल्याण तावरे उपस्थित होते. उद्योजक विजय गडाख,उदयन गडाख व गडाख परिवारातील सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पंचक्रोशीतील प्रतिक लांडे, ऋषिकेश तळेकर, शिवम लोहकरे, अमोल दत्तात्रेय भुसाळ,निकिता दराडे-दहिफळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. सुभाष देवढे यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!