गुहा: पत्रकार राहुल कोळसे: सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा असून पतसंस्था समाजाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रेरणा पतसंस्थेने केलेली प्रगती आणि विश्वासावर उभी असलेली कार्यपद्धती कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन दक्षिण सोलापूरचे आमदार तथा राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास आ. सुभाष देशमुख यांनी मंगळवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी प्रेरणा परिवाराचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी आ. देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.आ. देशमुख यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
पुढे बोलताना आ.देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक आधार देत संस्था सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करत आहे. पारदर्शकता, शिस्तबद्ध नियोजन आणि सेवाभावी वृत्ती यामुळे प्रेरणा पतसंस्थेला वेगळी ओळख मिळाली आहे. भविष्यातही संस्था अशीच प्रगती करत समाजहिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रेरणा मल्टिस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे, मच्छींद्र हुरुळे, वेणुनाथ लांबे, अशोक उर्हे,बाळासाहेब वाबळे, आवडीनाथ वाबळे, शरद वाबळे, डॉ. विजय वाबळे, रामा बर्डे, रवींद्र डौले, मुकेश चंद्रे, अक्षय ओहोळ, संकेत चंद्रे, जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे, शाखा व्यवस्थापक महेश सिनारे, सोमनाथ शिंदे, अरुण शिंदे, प्रशांत कोल्हे आदींसह गुहा ग्रामस्थ उपस्थित होते.


