Sunday, April 19, 2026

हर्षदा नजन नेट परीक्षा उत्तीर्ण

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधि

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील उद्योजक  बापूसाहेब नजन यांची कन्या कु. हर्षदा नजन ही राष्ट्रीय चाचणी संस्थेने (National Testing Agency) घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत(नेट) उत्तीर्ण झाली आहे. 

 नेट परीक्षा  ही भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदासाठी आणि ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’ मिळवण्यासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा NTA (National Testing Agency) द्वारे वर्षभरात दोनदा घेतली जाते.
हर्षदा नजन हिने पुणे विद्यापीठ येथे एम.एसस्सी पदव्युत्तर पदवी  शिक्षण पूर्ण केलेले आहे.ती लाईफ सायन्स विषय घेऊन नेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे भेंडा  परिसरातून अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!