Sunday, April 19, 2026

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कामांना गती द्या-ना.राधकृष्ण विखे पाटील

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कामांना गती देण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जलसंपदा मंत्री राधकृष्ण विखे पाटील यांनी आज गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्रालयातील दालनात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत महामंडळाच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध जलसिंचन प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, प्रकल्पांची सद्यस्थिती, निधी वितरण, भूसंपादन, तांत्रिक अडचणी तसेच कामाच्या प्रगतीचा टप्पा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

तसेच नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पांबाबतही सविस्तर चर्चा केली. यावेळी लाभक्षेत्राचा विस्तार, पाणी उपलब्धता, कालव्यांचे जाळे, शेतीसाठी होणारा फायदा आणि भविष्यातील नियोजन यांचा विचार करून पुढील कार्यवाहीबाबत दिशा निश्चित करण्यात आली.

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेले सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण व्हावेत, गुणवत्ता अबाधित राखावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित विभागांनी मिशन मोडवर काम करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या. तसेच, प्रशासकीय स्तरावर समन्वय वाढवून अडथळे तात्काळ दूर करण्याचेही निर्देश बैठकीत दिले.

याशिवाय सिंचन क्षमतेत वाढ करून शेती उत्पादन वाढीस चालना देणे आणि जलव्यवस्थापन अधिक सक्षम करणे, या उद्दिष्टांसाठी महामंडळाच्या कामांना अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!