Wednesday, April 22, 2026

घोडेगावात मांगिरबाबा यात्रा उत्सवाला सोमवार पासून सुरुवात

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मांगिरबाबा यात्रा उत्सवाला  सोमवार दि.२ पासून प्रारंभ होत आहे.

यात्रेनिमित्त घोडेगावात भक्ती, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम पाहायला मिळत असून यात्रा कमिटीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहेत.

सोमवार दि. २ रोजी पहाटे ५ वाजता भव्य कावड मिरवणुकीने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. सकाळी साडेनऊ वाजता मांगिरबाबा नैवेद्य व श्री घोडेश्वरी देवीस चोळी-पातळाचा पारंपरिक विधी पार पडेल. रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्रातील नामांकित बँडपथकांचा जुगलबंदी कार्यक्रम रंगणार असून त्यामध्ये जय सद्गुरू ब्रास बँड, श्री सद्गुरू ब्रास बँड, उस्मान शहा ब्रास बँड आणि नाद हलगी यांचा सहभाग असणार आहे.
रंगतदार नृत्य स्पर्धेने उत्सवाची सुरुवात होणार आहे. यानिमित्त आकर्षक रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी प्रथम क्रमांक ३१०० रुपये , द्वितीय क्रमांक २१०० रुपये आणि तृतीय क्रमांक ११०० रुपये अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

बुधवार दि. ४ रोजी महाराष्ट्रातील अग्रेसर कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम सादर होणार असून याच दिवशी नृत्य व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सोहळा देखील पार पडणार आहे.
यात्रेनिमित्त भाविकांनी व नागरिकांनी उत्सवात सहभागी होऊन परंपरा आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!