नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने ११९ दिवसांत १० लाख ७९० मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला असून ५ मार्चला गळीत हंगामाची सांगता होणार आहे.
*मागील हंगाम…*
मागील २०२४-२५ च्या ५१ व्या गळीत
हंगामात कारखान्याने कार्यक्षेत्रात कमी ऊस उपलब्ध असल्याने १०५ दिवसांचा हंगाम झाला होता. मागील हंगामात ८ लाख ११ हजार ५८० मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ७ लाख ८ हजार साखर पोत्यांची निर्मिती केली होती,३१.५ मेगावॉट क्षमतेच्या वीज प्रकल्पातून सहविज निर्मिती प्रकल्पातून निर्माण झालेली ३ कोटी १३ लाख ७५ हजार ४४४ यूनिट विज निर्यात करण्यात आली होती.तसेच सिरप पासून ४६ लाख ७१ हजार लिटर तर बी-हेवी मोलासेस पासून ३५ लाख लिटर इथेनॉल निर्मिती केली होती.
*यावर्षीचा हंगाम…*
यंदाच्या २०२५-२६ च्या ५२ व्या गळीत
हंगामात कारखान्याने दि.१ मार्च अखरब ११९ दिवसांत १० लाख ७९० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. दिवसाला सरासरी ८ हजार ४१० टनाप्रमाणे गाळप झाले.
३१.५ मेगावॉट क्षमतेच्या वीज प्रकल्पातून ११६ दिवसांत ६ कोटी २९ लाख ७५ हजार ८५९ युनिटची निर्मिती ३ कोटी ९६ लाख ५८ हजार २०० युनिट विज निर्यात केली. तर ११४ दिवसांत १ कोटी ९ लाख ३० हजार ३४ लीटर इथेनॉल निर्मिती झाली आहे.
*५ मार्चला हंगाम सांगता…*
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ५२ व्या गळीत हंगामाची सांगता गुरुवार दि.५ मार्च १०२६ रोजी सकाळी १० वाजता कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, केकारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग व संचालक मंडल यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक अनिल शेवाळे व सरव्यवस्थापक रविंद्र मोटे यांनी दिली.


