Thursday, June 25, 2026

अल्फा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगला खेळ पैठणीचा

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील चंद्रभागा मागासवर्गीय महिला विकास प्रतिष्ठान संचलित अल्फा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला.

महिला दिनाचे औचित्य साधून दि.९ मार्च रोजी अल्फा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने शाळेच्या मार्गदर्शिका सौ.रिपीका गुलाबराव खरात यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भेंडा खुर्दच्या सरपंच वर्षा नवले, नायब तहसीलदार सोनाजी मगर, राजाराम खरात,सौ.सुजाता आल्हाट,सौ.सुरेखा मगर,हर्षल खरात,सचिन खरात आदी उपस्थित होते.
यावेळी आयोजित विविध स्पर्धेत महिलांनी भाग घेतला. स्पर्धेतील प्रत्येक विजयी स्पर्धकास बक्षीस म्हणून पैठणी साडया देण्यात आल्या. इतर सर्व सहभागी महिलांना विविध भेटवस्तू देण्यात आल्या.शाळेतील मुलांनी भाषणे केली.
शाळेचे मुख्याध्यापक दीपक चौधरी, व्यवस्थापक भाऊसाहेब गोरे, शिक्षिका रेखा पवार,सविता ढवाण, शुभांगी वैराळ,काजल शिंदे, सुवर्णा मापारी, प्रियांका वाघमारे, सुरेश माताडे, अविनाश बनकर, माधव बनकर,सुनील खरात,सतिष सोनकांबळे,मनिषा बनकर, राणीताई खरात यांनी
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.
शेवगाव येथील निवेदक बी.जितेंद्र यांनी महिलांचे विविध खेळ घेतले. आशा शिंदे सूत्रसंचालन यांनी केले.मोहिनी नवले यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!