Thursday, June 25, 2026

नेवासे फाटा येथे उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर होणारे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन भानसहिवरे मंडलाचे वतीने आज शनिवार दि. १४ रोजी स.१० ते सांय.५ यावेळेत नेवासा फाटा येथे करण्यात आलेची माहिती तहसीलदार संजय बिरादार व भानसहिवरे मंडलाधिकारी सरिता मुंडे यांनी दिली आहे.

अधिक माहिती देताना मंडलाधिकारी सरिता मुंडे यांनी सांगितले की,नेवासा फाटा (मुकिंदपूर) येथील जी.के.मंगल कार्यालयात होणाऱ्या याशिबिराचे उद्घाटन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सुभाष दळवी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्यासह मंडळातील सर्व गावातील, सरपंच, सेवा संस्थेचे अध्यक्ष व सदस्य आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे.

महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे या उद्देशाने राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन केले आहे,

या शिबिरास भानसहिवरे मंडळातील नेवासे फाटा (मुकिंदपूर) सुरेशनगर, मक्तापुर, पिचडगाव, नागापुर, रांजणगाव देवी, सौंदाळे, खुणेगाव, उस्थळ दुमाला गावातील शेतकरी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडलाधिकारी सरिता मुंडे तसेच मंडळातील आकाश जोशी, श्वेता काळे, रमेश रिंडे, सोमनाथ गलांडे, गोरक्षनाथ दराडे या ग्राम महसूल अधिकारी यांनी केले आहे.

*शिबिराचा उद्देश…

महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे या उद्देशाने राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!