Thursday, April 30, 2026

भेंडा येथे हनुमान जन्मोत्सवा निमित्त पाच दिवशीय किर्तन महोत्सवाचे आयोजन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीक्षेत्र पावन  दक्षिणमुखी  हनुमान  मंदिरात साजरी करण्यात  येणाऱ्या हनुमान जन्मोत्सव सोहळया निमित्त पाच दिवशीय किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

भेंडा येथील पावन  दक्षिण मुखी  हनुमान मंदिरात हनुमान 
 जन्मोत्सव  नियोजनाची बैठक दि.१४ मार्च रोजी सांय.६ वाजता पार पडली. या बैठकीत अधिक माहिती देतांना श्रीराम सेवक बापूसाहेब नजन यांनी सांगितले की,  श्रीसंत  नागेबाबांच्या पावन भुमीत  मंहत भास्करगिरीजी महाराज, गुरूवर्य मिराबाई महाराज मिरीकर , महंत सुनिलगिरी महाराज यांच्या प्रेरणेने  दक्षिण मुखी हनुमान मंदिरात दि.२९ मार्च  ते २ एप्रिल २०२६  या कालावधीत
भव्य हनुमान जयंती  उत्सव होत आहे. त्यानिमित्त रविवार २९ मार्च रोजी सायं ७ ते ९ महंत रमेशानंदगिरीजी महाराज यांचे कीर्तन,सोमवार ३० रोजी सायं ७ ते ९ अनंत महाराज तनपुरे यांचे कीर्तन, मंगळवार ३१ रोजी सकाळी ८ वाजता प्रकाशानंदगिरी महाराज यांची सदिच्छा भेट, सायं ७ ते ९ निलेश महाराज वाणी यांचे कीर्तन, बुधवार ०१ एप्रिल रोजी सायं ७ ते ९
वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांचे कीर्तन, गुरुवार ०२ एप्रिल रोजी  हनुमान जन्मोत्सवानिमित्त
सकाळी ५ वाजता  ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांचे हस्ते  श्रींचा सुर्योदय पंचामृत महाअभिषेक व जन्मोत्सव सोहळा,सकाळी ८:३० वाजता महंत बालयोगी अमोलजी महाराज (श्रीराम संस्थान वाकोडी, अहिल्यानगर) यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद होईल.
दररोज सकाळी ९ ते १० रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा पाठ, रामनाम जप होईल. दररोज सांयकाळी  कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.
यानिमित्त हनुमान मंदिर परिसर स्वच्छता ,अन्नदान व्यवस्था, पार्किंग व्यवस्था ,महिला भाविकांची सुरक्षा,लाईट व्यवस्था यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सेवा मंडळाने  केले आहे.

या बैठकीला कुंडलिक महाराज गोरे, गणेश महाराज चौधरी,शिवाजी फुलारी, भाऊसाहेब फुलारी, वाल्मीक लिंगायत, विश्वास कोकणे,डॉ.रजनीकांत पुंड, राम गरड, राजू तागड, श्रीकांत शिंदे, तात्या फुलमाली, अशोक लोहकरे,देवेंद्र काळे, बंडू आंदुरे, चांगदेव जगताप, रमेश मिसाळ, केशव पंडित,रमेश आरणे, विलास फुलमाळी,अर्जुन शिंदे, गणेशदेवा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!