Thursday, June 25, 2026

उत्तमराव पाटील यांच्या नूतन घराचा सत्यशोधक पद्धतीने गृहप्रवेश

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील तरवडी येथील जेष्ठ सत्यशोधक व अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष श्री.उत्तमराव पाटील यांच्या नूतन घराचा सत्यशोधक पद्धतीने
गृहप्रवेश संपन्न झाला.

शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी सत्यशोधक पद्धतीने सत्यशोधक विधीकर्ते श्री साळोबा पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली हा गृहप्रवेश संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा फुले लिखित ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथातील “सत्य सर्वांचे आदिघर” या कवनाने करण्यात आली. त्यानंतर सत्यशोधक पद्धतीने पूजा विधी पार पडला. गृह प्रवेश पूजेकरिता भारतीय संविधानाची प्रत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सत्यशोधक कृष्णराव भालेकर ,दीनमत्रकार मुकुंदराव पाटिल, श्रीविठ्ठल, संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज,संत सावता माळी व पाटील कुटूंबियांचे वारसांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.
मुकुंद पाटील व शुभांगी पाटील या तरुण दांपत्यांच्या हस्ते ही पुजा करण्यात आली. यशवंत पाटील, जयश्री पाटील,सुनिता वाघ, अनिता देवतकर, मयुरी वाडकर, चेतन वाडकर, आशिष व पल्लवी देवतकर, भारत मंडलिक, मनीषा मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, शुभम मंडलिक, मोहिनी मंडलिक, आशा दरवडे, राजेंद्र दरवडे, अजित पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी पाटील परिवाराच्या वतीने सत्यशोधक विधीकर्ते साळोबा पांडव यांचे आभार मानण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!