नेवासा/प्रतिनिधी
सौंदाळा गावाच्या धर्तीवर सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली वारकरी संप्रदायाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जातमुक्ती अभियान राबविण्याचा निर्धार श्रीक्षेत्र पंढरपुर येथील कैकाडी महाराज आश्रमाचे मठाधीपती ह.भ.प.भारत जाधव (कैकाडी) महाराज यांनी व्यक्त केला.
नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने जातमुक्तीच्या निर्णय घेतल्याबद्दल गावचे सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थांचा सौंदाळा येथे वारकरी सांप्रदाय व अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात कैकाडी महाराज बोलत होते.भक्ती संगम समुहाचे संचालक ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर,विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील, जगद्गुरु तुकोबाराय गाथा प्रचारक ह.भ.प.भारत महाराज घोगरे, घेरडीकर वारकरी फडाचे प्रमुख ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर,डॉ. रफिक सय्यद, जेष्ठ नेते कॉ.बाबा आरगडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, बी.के.चव्हाण,आप्पासाहेब वाबळे, कॉ.भारत आरगडे, गणेश आरगडे,उपसरपंच भिवसेन गरड,लक्ष्मण आरगडे, कोमल आरगडे, श्रद्धा आरगडे, उत्तमराव आरगडे, बाळासाहेब आरगडे,मधुकर आरगडे, कृष्णा चामुटे,ज्ञानदेव चामुटे, मंगल बोधक,क्रांती आरगडे, ज्योती बोधक, जगन्नाथ आढागळे, मंजु आढागळे आदी यावेळी उपस्थित होते.
कैकाडी महाराज पुढे म्हणाले की,भारतातील पाहिले जातमुक्त सौंदाळा हे प्रति पंढरपूर आहे. इथं खऱ्या अर्थाने संतांनी सांगितलेल्या विचाराने मानव हाच धर्म माणुसकी हीच जात ग्रामस्थांनी मानली असुन देशा पुढे आदर्श निर्माण केला आहे.
हा विचार अखंड महाराष्ट्रात राबविण्याचा वारकरी संप्रदायाच्या वतीने ठरविले असून सरपंच शरद आरगडे यांनी अध्यक्ष पद भूषवून वारकरी संप्रदायाला सोबत घेऊन यासाठी पुढाकार घ्यायचा आहे.
ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर, ज्ञानेश्वर महाराज बंडगर,भारत महाराज घोगरे,विवेकवादी अविनाश पाटील,एकनाथ महाराज राहणे यांची ही भाषण झाली.
सरपंच शरद आरगडे. जेष्ठ मार्गदर्शक कॉ.बाबा आरगडे व उपसरपंच भिवसेन गरड व ग्रामपंचायत सदस्य यांचा यावेळी महात्मा जोतिबा फुले यांची पगडी घालुन तुकाराम महाराजांची गाथा देऊन सत्कार करण्यात आला.
निवृत्ती काळे यांनी आभार मानले.


