Wednesday, May 13, 2026

कुकाण्यात रमजान ईद उत्साहात साजरी

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील ईदगाह मैदानावर ईद उल फित्र रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

पवित्र रमजान मुस्लिम बांधवांनी महिन्यात महिनाभर उपवास, करून अल्लाहची ईबादत केली.यावेळी हाजी शमशाद पठाण यांनी नमाज पठण केले तर इम्रान शेख मौलाना यांनी खुदबा पठण व दुवा केली.मौलाना इम्रान शेख यांनी आपण आपल्या धर्माचे पालन करत असतांना, इतर धर्माचा आदर करून, इस्लाम धर्मातील नमाज,रोजा, जकात हज या गोष्टीचे पालन करावे तसेच चांगले कर्म करण्याचे व इतरांच्या भावनांचा आदर करण्याचे आवाहन उपस्थित बांधवांना केले.

यावेळी विलास देशमुख यांनी महिनाभराची इबादत,देवावर अढळ विश्वास यांचा मिलाप म्हणजे रमजान ईद असून जातीय सलोखा कायम रहावा अशी सदिच्छा व्यक्त केली.

इस्लाम धर्माची शांतीची शिकवण,संयम या गोष्टीचे आचरण मुस्लिम बांधवांकडून होईल असा आशावाद व्यक्त केला. यावेळी हमीद नालबंद, अब्दुलभैय्या शेख,जामे मस्जीद अध्यक्ष प्रा. रज्जाकशहा इनामदार, ईन्नुसभाई नालबंद,मुसाभाई इनामदार, मतीन ईनामदार, ईस्माइल नालबंद,समीर पठाण,आरीफ तांबोळी,जमाल शेख, पापाभाई शेख,फैय्याज तांबोळी, सिकंदर शेख,अब्बास पटेल,रसुल इनामदार, पत्रकार अनिल गर्जे,प्रा.लतीफ शेख, कैलास म्हस्के,ईकबाल इनामदार,नबाब शहा, चाँद शेख, मा.उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे ,किरण शिंदे, सचिन साबळे, अमोल बर्डे यांच्या सह हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

सलिमभाई इनामदार यांनी प्रास्ताविक केले. प्रा शकुर शेख यांनी आभार मानले.नेवाशाचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील ,पोलीस नाईक शहाजी आंधळे, हरिभाऊ धायतडक, वासुदेव डहाळे,पो.ना.बडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!