भेंडा/नेवासा
निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाईमुळे मोठे कष्टाने आणलेले ऊस पिक अडचणीत आल्याने त्यातून सुटका होण्यासाठी यंदा लवकर गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.प्रतिकूल परिस्थितीतही
उच्चांकी ऊस गाळप करू अशी ग्वाही लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना ५५वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, अड.देसाई देशमुख, तज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील, संचालक डॉ.नारायण म्हस्के,पंडितराव भोसले,अशोकराव मिसाळ,दत्तात्रय काळे, जनार्धन कदम, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अड.हिम्मतसिंह देशमुख,अमोल अभंग, विकास नन्नवरे,संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, सौ.सुमनबाई काळे,रवींद्र नवले,अंकुशराव काळे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,जनरल मॅनेजर रविंद्र मोटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वर माऊली व लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
श्री.नरेंद्र घुले पाटील पुढे म्हणाले की, सहकारी चळवळ चालवतांना कुठलाही पक्षभेद न ठेवता काम करावे लागते.ज्ञानेश्वर सहकारी कारखाना बिनविरोध निवडणूक केली त्याबद्ल सर्व सभासद,लोक प्रातिनिधी यांचे आभारी आहोत.मुळा व जायकवाडी पाण्यावर शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे त्यांना शेतीसाठी पाणी मिळालेच पाहिजे.मुळा धरणाचे आवर्तन सुरू असताना टेल टू हेड भरणे झाले तर सर्वांचे भरणे निघते आणि पाणी जिरल्याने भूजल पातळी वाढून सर्वांचाच फायदा होतो.
दुष्काळी परिस्थिती सर्व जनतेला व जनावरांनाही पिण्याचे पाणी देण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करणे सरकारला शक्य होणार नाही,त्यामुळे बॅकवॉटर वरील पंपाचे विज जोड तोडणे व्यवहार्य होणार नाही. दुष्काळ कायमस्वरूपी घालवायचा असेल तर पश्चिम वाहिनी नदीचे पाणी तातडीने गोदावरी खोऱ्यात आणणे ही काळाची गरज आहे. सरकारने लवकरात लवकर प्रश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे. सर्वांनी आपल्याच कामधेनूला ऊस दयावा असे आवाहन करून गाळप चांगले झाले तर ऊस भाव ही जास्तीत जास्त देता येतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने यंदाचा गाळप हंगामाचा आलेख एक नंबरचा राहील अशी ग्वाही श्री.घुले यांनी दिली.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले,
लोकनेते मारुतराव घुले पाटील व
स्वर्गीय वकीलराव लंघे अण्णा यांचेसह इतर जेष्ठ नेत्यांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनात एकत्र काम केले. ज्ञानेश्वर कारखाना आपल्या सर्वांची कामधेनु आहे.
राज्यात आणि तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सध्या मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असून अद्यापही ४० टक्के भरणे बाकी आहेत. टेल टू हेड भरणे काढले जात आहेत. या आवर्तनानंतर अजून एक आवर्तन घेण्याचा आपला प्रयत्न असेल परंतु त्याच्या भरवशावर पिके घेणे धोक्याचे ठरणार आहे. सर्वानी पाण्याचे योग्य नियोजन करावे. बॅक वॉटर वरील
पंपाचे विज जोड तोडणार नाही याची काळजी घेऊ. दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे टनेज घटलेले आहे, त्यामुळे यावर्षी चांगला भाव द्यावे लागेल. कामधेनू टिकावी ही सर्वांचीच प्रामाणिक भावना आहे,परंतु सभासद हिताचे निर्णय घ्यावे लागतील असे ही श्री.लंघे म्हणाले.
मा.आ.पांडुरंग अभंग म्हणाले की,चार वेळा उसाची एफआरपी वाढली परंतु एकदाही साखरेच्या एमएसपी मध्ये वाढ झालेली नाही. यंदा एलनीनो संकट पावसाचे अल्प प्रमाण यामुळे ऊसावर रोग हुमणी आळी प्रादुर्भाव, यामुळे उसाचे एकरी टनेज घटणार आहे,साखर उताऱ्यात ही घट होणार असल्याने शासनाने प्रतिटन पाचशे रुपये अनुदान द्यावे.या हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाला प्राधान्य देत सर्व उसाचे गाळप केले जाईल, ऊस वजन काटा ही अचूक आणि पारदर्शक आहे. सर्वांनी आपला ज्ञानेश्वर कारखान्यालाच दयावा, ऊस दरात आपण अव्वल राहू अशी ग्वाही श्री.अभंग यांनी दिली.
जेष्ठ नेते अड.देसाई देशमुख म्हणाले की,ज्ञानेश्वर कारखान्याने मार्गदर्शन व सहकार्य करून शेतकऱ्यांमध्ये ऊस निर्माण करण्याची कुवत निर्माण केली,
कार्यक्षेत्रात जास्त ऊस उत्पादन होऊनही कारखान्याला कमी ऊस पुरवठा होतो ही बाब योग्य नाही. आपला कारखाना टिकावा यासाठी सर्वांनी आपल्याच कारखान्याला दिला पाहिजे.
स्वागत व प्रस्ताविक करताना कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे पाटील म्हणाले की, अत्यंत अडचणीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी ज्ञानेश्वर कारखान्याची स्थापना केली. नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील यांनी कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण झाले. कारखाना आज तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण झालेला आहे. दुष्काळी परिस्थितीत यंदाच्या गळीत हंगामाला सामोरे जावे लागणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी करू.
अंकुशराव काळे, दिनकरराव गर्जे, रामदास कोरडे, ताराचंद लोढे, यांनीही मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ विधीज्ञ अड. सतीश पाटील, माजी संचालक काशिनाथ नवले पाटील,शिवाजीराव कोलते, दादासाहेब गंडाळ, संजय कोळगे, जनार्दन पठारे, सुधाकर लांडे, सखाराम लव्हाळे, विष्णुपंत जगदाळे, शिवाजीराव भुसारी, निवृत्ती दातीर, रामभाऊ जगताप, राजेंद्र मते, माणिकराव थोरात, भास्कर खेडकर,अंबादास कळमकर,अनिल मडके, अड.विश्वास काळे, अड.शिवाजीराव दसपुते, शरद आरगडे, वैभव नवले, डॉ.सुदाम खाटीक, शेषराव साबळे,संतोष म्हस्के,ज्ञानदेव पाडळे, बबन भानगुडे,एकनाथ भुजबळ,बाबासाहेब आगळे, काकासाहेब घुले, संभाजी पवार, संभाजी आगळे, भाऊसाहेब आगळे,बबनराव धस, शेषराव दुकळे, हरिभाऊ दुकळे, मिलिंद कुलकर्णी, बजरंग मुंगसे, कारभारी चिडे, बन्सी मुंगसे, मोहनराव गायकवाड,अनिल घोरपडे, गणेश खंबरे, अशोक धस अशोक वायकर गणेश गव्हाणे,एकनाथ कसाळ, बाळासाहेब नवले,अजित मुरकुटे, प्रभाकर कोलते, बबनराव जगदाळे, पुरुषोत्तम सर्जे, संदीप खरड, राहुल बेडके, हुकूम नवले,नवनाथ साळुंके, रामकृष्ण कांगुणे, भानुदास कावरे, जनार्दन कदम, गोरक्षनाथ कापसे, अशोक मेरड, दत्तात्रय विधाटे, दत्तात्रय खाटीक, काकासाहेब लबडे, आप्पासाहेब देशमुख, आप्पासाहेब गर्जे, मधुकर वावरे, पंडित वाघ, जनार्दन हारदे, कचरू वाबळे, अरुण खंडागळे, सतीश चुत्तर, सोपान महापूर, विश्वनाथ मते आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी सभा नोटीसीचे वाचन केले.
जनरल मॅनेजर रवींद्र मोटे यांनी अहवाल सालातील दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करणारा ठराव मांडला व मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले.
मुख्य लेखपाल रामनाथ गरड यांनी नफा-तोटा पत्रके, ताळेबंदाचे वाचन केले.

महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कामगार संचालक सुखदेव फुलारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
भाऊसाहेब सावंत व कल्याणराव म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. संचालक अशोकराव मिसाळ यांनी आभार मानले.


