Tuesday, October 6, 2026

नजिक चिंचोली येथे  खडेश्वरी देवी नवरात्र महोत्सवाचे आयोजन

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथील श्री खडेश्वरी देवी मंदिरात दि.११ ऑक्टोबर पासून नवरात्र महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महंत गणेशानंदजी महाराज यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली गावचे उत्तरेला एका उंच टेकडीवर जगदंबा देवीचे मंदिर आहे.या देवीचे नाव खडेश्वरी देवी असे पण आहे.उंच टेकडीवर असल्याने व सभोवताली घनदाट वृक्षवल्ली असल्याने मंदिर परिसर रमणीय आहे. दरवर्षी नवरात्रामध्ये मोठा उत्सव होऊन हरिनाम सप्ताह ही होत असतो. माहूरची रेणुका देवी व त्या शेजारीच तुळजापूरची तुळजाभवानी असे दोन शक्ती पीठे एकत्रित असलेले हे अलौकिक व दुर्लभ शक्ती पीठ आहे.

रविवार दि.११ ते  मंगळवार दि.२० ऑक्टोबर पर्यंत तेथे  नवरात्र महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ७ ते १०.३० श्री संवराज ज्ञानेशारी पारायण, सकाळी १०.३० ते ११ महाआरती, दुपारी११ ते १२ फराळ सायं ५.३० ते ६ महाआरती, सायं ६.३० ते ८.३० किर्तन सेवा व त्यानंतर फराळ व नंतर जागर असे कार्यक्रम होतील.

*सप्ताह काळातील कीर्तन सेवा–

दि.११ रोजी महंत विजयजी महाराज खेडकर (श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी माता संस्थान लिंबेजळगाव),दि.१२ रोजी महंत अभयानंदगीरी महाराज (श्रीक्षेत्र कैलास आश्रम वेरुळ),दि.१३ रोजी मृदुंगमहर्षी वैराग्यमूर्ती युवराजकाका देशमुख (श्रीक्षेत्र आळंदी देवाची), दि.१४ रोजी वेदांताचार्य भगवानजी महाराज जंगले (श्रीक्षेत्र रामकृष्ण आश्रम गोणेगांव),दि.१५ रोजी महंत देविदासजी महाराज म्हस्के (श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान,श्रीक्षेत्र नेवासा),दि.१६ रोजी महंत प्रकाशानंदगीरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान),दि.१७ रोजी महंत ज्ञानेश्वर महाराज हजारे (श्रीक्षेत्र माऊली आश्रम, पिचडगांव),दि.१८ रोजी महंत बाळकृष्ण महाराज दिघे (श्रीक्षेत्र रामगड संस्थान, गणेशवाडी, ता.गंगापुर), दि.१९ रोजी श्रीगुरु पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी (श्री ज्ञानेश योग आश्रम संस्था श्री क्षेत्र डोंगरगण सितेचे) यांची कीर्तन सेवा होणार आहे.

शनिवार दि.१७ ऑक्टोबर रोजी सातवी माळे निमित्त खडेश्वरीदेवी यात्रा महोत्सव होणार असून गावातील व परिसरातील गुनिजन मंडळींचे भजन होईल, दुपारी १ ते ३ न्यु इंग्लिश स्कुल गेवराई यांचा दांडीया नृत्याचा कार्यक्रम होईल. सांय.६ ते ७ छबिना मिरवणुक
होईल.
मंगळवार दि.२० ऑक्टोबर रोजी सकाळी महंत गणेशानंदजी महाराज (श्री खडेश्वरी संस्थान,नजिक चिंचोली) यांचे काल्याचे कीर्तन होऊन उपस्थित भाविकांना शिवाजी पाठक,मेजर रामचंद्र पाठक, बाळासाहेब पाठक यांचे कडून महाप्रसादाची पंगत देण्यात येईल. 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!