पाथर्डी/प्रतिनिधी
श्री संत नागेबाबा मल्टिस्टेटने आपल्या सभासद ठेवीदारांसाठी घेतलेल्या नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेतून अपघाती मृत्यू झालेल्या सभासदाच्या वारसांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट, अहिल्यानगर ही संस्था वर्षाचे ३६५ दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून व संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक, शैक्षणिक,सामाजिक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे.
संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपला परिवारातील घटक आहे. याचा विचार करून आपल्या संस्थेतील सभासदांसाठी नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजना चालू केलेली यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते तसेच अपघात झाल्यास ५ लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च देण्यात येतो. या योजनेतून त्या कुटुंबाचा खरा आधार देण्याचे काम संस्था करत असते.
श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट पाथर्डी शाखेचे खातेदार सभासद कै.अक्षय महादेव काळे यांचे मागील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेली होती, त्यांना १० लाख रुपयांचा धनादेश नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने पाथर्डी शाखेचे खातेदार व मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्तकरण्यात आला.
नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष कडूभाऊ काळे, तज्ञ संचालक अमित फिरोदिया, नागेबाबा देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव तागड, संजय मनवेलिकर, सुनील गव्हाणे,भाऊसाहेब फुलारी, राजेंद्र चिंधे,पतसंस्थेचे मैनेजर श्री.सुसे साहेब यांचेसह नागेबाबा परिवारातील सर्व सभासद यावेळी उपस्थित होते.


