Saturday, March 28, 2026

सोनई शिवारात गावठी कट्टा बाळगणा-या आरोपीला अटक

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सोनई, श्रीरामवाडी शिवारात गावठी कट्टा (अग्निशस्त्र) बाळगणा-या आरोपीविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ०१ गावठी कट्टा व ०२ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, बाळासाहेव नागरगोजे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल बागवत, चालक उमाकांत गावडे, महादेव भांड तसेच दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर नेम. सायबर पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करुन सदर पथकास सोनई पोलीस हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेवावत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.

दि. २६/०३/२०२६ रोजी नमुद पथक हे सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अमोल रावसाहेब विटनोर रा. मांजरी ता. राहुरी हा सोनई ते खेडले परमानंद जाणारे रोडवर श्रीरामवाडी परिसरात कॅनलवर त्याचे कब्जात विनापरवाना अग्निशस्त्र बाळगुन थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी सोनई ते खेडले परमानंद जाणारे रोडवर श्रीरामवाडी परिसरात जावुन खात्री करता एक इसम कॅनलवर संशयीरित्या बसलेला दिसुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव अमोल रावसाहेब विटनोर (वय २७ वर्षे) , रा. मांजरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर असे असल्याचे कळवले. सदर इसमाची झडती घेतली असता त्याचे कमरेला ३० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), २ हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे, असा एकुण ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला आहे.ताब्यात घेण्यात आलेला इसम नामे अमोल रावसाहेब विटनोर याचेकडे मिळुन आलेल्या अग्निशस्त्र व काडतुसाबाबत विचारपुस करता त्याने मिळुन आलेले अग्निशस्त्र व काडतुसे विक्री करीता आणले असल्याचे सांगितले.

अमोल रावसाहेब विटनोर रा. मांजरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर याचेविरुध्द यापुर्वी सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. ८६/२०२६ आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल असुन तो सदर गुन्ह्यात फरार होता.

ताब्यातील इसमाविरुध्द पोहेकॉ ४३७ सोमनाथ आसमानराव झांबरे नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं.१०२६/२०२६ आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!