भेंडा/नेवासा
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त आज शनिवार दि.११ जुलै रोजी सांय ५:३० वाजता भेंडा येथे समाज प्रबोधनकार प्रा.डॉ.अनिल लोखंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा बस स्थानक चौकात होणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव व व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक व भेंडा बुद्रुक ग्रामस्थांनी केले आहे.




