Friday, April 3, 2026

आदित्य मुरकुटे यांची अकासा एअरमध्ये को-पायलट पदी निवड

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-02 at 7.54.58 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त संभाजीराव मुरकुटे यांचे चिरंजीव आदित्य सुवर्णा संभाजी मुरकुटे याची अकासा एअर (मेसर्स एसएनव्ही एव्हिएशन प्रा.लि.) मध्ये ज्युनिअर फर्स्ट ऑफिसर / को-पायलट म्हणून निवड झाली आहे.

आदित्य दि.२ एप्रिल रोजी सेवेत रुजू झालाअसून सुरुवातीला तो गुडगाव (हरियाणा) येथे रुजू होईल आणि त्यानंतर दि.२२ एप्रिल पासून बंगळूर (कर्नाटक) येथे असेल.
त्याने सिंहगड इन्स्टिट्यूट, वडगाव पुणे येथून बी.ई. मेकॅनिकल पदवी घेतली.
२०२० मध्ये डी.जी.सी.ए. विषय मंजुरी मिळाली.
सेसना १७२,पायपर सेसना,टेक्नाम २०० जीटी,बोईंग ७३७ एनजी (टाईप रेटेड) येथे उड्डाणाचा अनुभव घेतला.
२०२०-२१ मध्ये ट्रेझर कोस्ट ट्रेनिंग अकॅडमी, स्टुअर्ट, फ्लोरिडा (यूएसए) मध्ये मुख्य प्रशिक्षण(कमर्शियल पायलट लायसन्स) झाले.
रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी, बारामती, पुणे येथे सिंगल इंजिन) कन्व्हर्जन,एन.एम.आय.एम.एस. शिरपूर (एम.एस.) येथे मल्टी इंजिन
सिमेरो पॅरिस (फ्रान्स), बोईंग ७३७ एनजी (टाईप रेटेड). मार्च २०२४ ते मार्च २०२६ M/s Aerodynamic Academy Pvt Ltd अंधेरी (E) मुंबईसाठी प्रशिक्षक म्हणून काम केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!