Wednesday, June 24, 2026

घोगरगाव येथे नृसिंह भगवान जयंती निमित्ताने आयोजित सप्ताहाची सांगता

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे नृसिंह भगवान जयंती निमित्त आयोजित सप्ताहाची महंत विश्वनाथगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तनाने सांगता झाली.

नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे नृसिंह भगवान यांचे जागृत देवस्थान आहे. बहिरम भट यांनी भगवती गितेतील दशम अध्यायावर टीका केली. ती टीका भैरवी नावाने प्रसिद्ध असा हा ग्रंथ आहे. बहिरा जातवेद आश्रमाचा सुमारे बारा एकराचा परिसर आहे. येथे भव्य दिव्य असे नृसिंह भगवान यांचे मंदिर बनवायचे आहे.त्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. नऊ दिवस चालणारा सप्ताह या वर्षी पंच दिन साजरा केला. इतर चार दिवस होणाऱ्या साप्ताहचा निधी मंदिर निर्माण करण्यासाठी वापर करणार आहे. गंगा गोदावारी घोगरगाव येथे घाट निर्मिती करायचा आहे.परिसराला वॉल कंपाउंड करायचे आहे. त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले.
माजी मंत्री शंकराराव गडाख यांनी येथे सभामंडप दिलेला आहे तर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सप्ताहास भेट देऊन सभामंडप देऊ असा शब्द दिला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!