Saturday, May 2, 2026

जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालय शास्र शाखेचा ९२.८७ टक्के निकाल 

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या  जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा ९२.८७ टक्के, वाणिज्य शाखेचा ६०.७८ टक्के तर कला शाखेचा ४९.०१ टक्के  निकाल लागला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दि.२ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.
या बोर्डाचे परीक्षे करिता  जिजामाता  विद्यालयाचे  बारावी विज्ञान शाखेचे एकूण ४०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
वाणिज्य शाखेचे एकूण ५१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेचे एकूण १०२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातील विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक  कु.श्रध्दा बापुसाहेब विधाटे ५०९ गुण(८४.८३ टक्के),द्वितीय क्रमांक कु.श्रावणी मनेष हिवाळे ४६२ गुण(७७.०० टक्के),तृतीय क्रमांक  कु.नम्रता विष्णु गिलबिले ४५५ गुण( ७५.८३ टक्के).

वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक कु.हर्षदा बाळदेव वाघ ४५० गुण (७५.०० टक्के),द्वितीय क्रमांक कु.अमृता अशोक हिवरे ३८५ गुण (६४.१७ टक्के),तृतीय क्रमांक कु. आक्षदा शिवाजी घाडगे ३८१ गुण (६३.५० टक्के).

कला शाखेत प्रथम क्रमांक कु.आरती कचरु नजन ४१४ गुण (६९ टक्के), द्वितीय क्रमांक कु.ऋतुजा सखाराम गदाई ३७७ गुण (६२.८३ टक्के),तृतीय क्रमांक कु.पुनम वसंत बोरुडे ३५५ गुण (५९.१७ टक्के).

शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग , अड. देसाई देशमुख,  सचिव अनिल शेवाळे , सहसचिव रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे , विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी मुंगसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!