Wednesday, June 24, 2026

प्रादेशिक नळ पुरवठा योजनेच्या कामगारांचा संप स्थगित

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर जिल्ह्यातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कंत्राटी कामगार संघटनेने १ मे पासून पुकारलेला बेमुदत संप तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

शुक्रवार दि.१ मे २०२६ रोजी पोलीस ग्राउंड, अहिल्यानगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याशी पाणी पुरवठा कामगार संघटनेच्या पदाधिकऱ्यांची बैठक घडवून आणली. संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपावर तोडगा काढण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. त्या अनुषंघाने प्रादेशिक नळ पाणी पुरवठा कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी यांची पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी कामगारांच्या प्रश्नां संदर्भात चर्चा झाली. संघटनेच्या बहुतांश मागण्यावर सर्वांचे एकमत झाले. कामगारांना किमान वेतन व त्यावर आधारित भविष्य निर्वाह निधी, कामगारांचा आरोग्य विमा देण्यात यावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित पाणी योजना समिती व ठेकेदार कंपनी यांना देण्यात यावे. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या पाणी समिती व ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले. त्याच प्रमाणे प्रत्येक पाणी योजनेवरील कामगारांचा अहवाल मागवून त्या योजनेवरील कामगारांची संख्या निश्चित करण्यासाठी व इतर बाबीसाठी येत्या १० दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे शिष्टमंडळ, पाणी समितीचे अध्यक्ष,सचिव व योजना चालवीणारे ठेकेदार यांची मिटिंग ठेवणार असून त्यावर इतर प्रश्नां संदर्भात चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहे.
एकदारीत संघटनेने वरील बाबींशी सहमत झाल्याने. मिटिंग होईपर्यंत संघटनेने पुकारलेल्या संपला तात्पुरती स्थगिती दिल्याचे महाराष्ट्र राज्य प्रादेशिक नळ पाणी पुरवठा कंत्राटी कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष शौकतभाई इनामदार यांनी जाहीर केले असून बंद केलेला पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे आदेश सर्व प्रादेशिक योजनेवरील कामगारांना देण्यात आले असून संप यशस्वी करणाऱ्या सर्व कामगार बांधूचे आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!