Saturday, May 2, 2026

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत।तरवडी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या कु.यशश्री गणेश निकम व कु. ईश्वरी किशोर कन्हेरकर या दोन विद्यार्थ्यांनी
आर्थिक दुर्बल घटक विदयार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (एनएमएमएस) जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या तर्फ घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विदयार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस शिष्यवृत्ती) २०२५-२६ या परीक्षेत तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती,संचलित, सत्यशोधक मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या येथील इ.८ मधील कु.यशश्री गणेश निकम हिने जिल्हा गुणवत्ता यादीत ओबीसी प्रवर्गातून १९ वे तर कु. ईश्वरी किशोर कन्हेरकर हिने ६९ वे स्थान मिळवले आहे.
तसेच विद्यालयातील इयत्ता ८ वीचे एकुण १० विदयार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.

एनएमएमएस शिष्यवृत्ती योजना ही केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळतो. तसेच शिक्षणाची गोडी वाढण्यास मदत होते.

संस्थेचे अध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग,उपाध्यक्ष कॉ. बाबा अरगडे, सचिव,उत्तमराव पाटील, सदस्य पद्ममाकां कुदळे, के. ई.हरिदास, यशवंत पाटील,रविंद्र अभंग, सरपंच,सौ.स्वप्नली क्षिरसागर, उपसरपंच सौ.रेखा घुले, सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन क्षिरसागर,उपाध्यक्ष बाबासाहेब नाईक, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!