Friday, July 31, 2026

ज्येष्ठ साहित्यिक मा.खा.यशवंतराव गडाख व परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची सदिच्छा भेट

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अहिल्यानगर येथे ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी खा. यशवंतराव गडाख यांच्या नगर येथील विरंगुळा निवासस्थानी सदिच्छा भेट देत विविध सामाजिक, समकालीन विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटी दरम्यान प्रा. राम शिंदे यांनी यशवंतराव गडाख यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील अनुभव, सामाजिक कार्य आणि विविध विषयांवरील विचार जाणून घेतले. अनेक वर्षांच्या सार्वजनिक जीवनातून त्यांनी समाजाला दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत, त्यांच्या अनुभवांतून विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन लाभल्याचे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
सभापती प्रा. राम शिंदे यांचा माजी खा. यशवंतराव गडाख व विजयराव गडाख यांनी सत्कार केला.
या प्रसंगी उद्योजक विजयराव गडाख उपस्थित होते. तसेच गडाख कुटुंबीयांनी प्रा. राम शिंदे यांचे आत्मीयतेने स्वागत करून त्यांचा सन्मान केला. सदिच्छा भेटीमुळे विविध विषयांवर सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!