Friday, August 7, 2026

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रा.सीताराम काकडे यांची नियुक्ति

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर (दक्षिण) जिल्हाध्यक्षपदी प्रा.सीताराम काकडे यांची नियुक्ति करण्यात आली असून,त्यांना प्रदेशाध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.

प्रा.सीताराम काकडे हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय असून जिल्हा कार्यकारिणी सदस्य,जिल्हा सरचिटणीस,जिल्हा उपाध्यक्ष, बूथ समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष अशा विविध पदावर काम केलेले असून सध्या ते पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
विद्यार्थी दशेपासूनच सत्यशोधकी विचारधारेमध्ये जडणघडण झालेले झालेले प्रा. काकडे हे सामाजिक-राजकीय क्षेत्राबरोबरच साहित्य,संस्कृती, शिक्षण व आध्यात्मिक क्षेत्रात आजपर्यंत काम करत आलेले आहेत.त्यांची काही पुस्तके प्रकाशित असून आज पर्यंत त्यांनी महाराष्ट्रभर पाच हजारांहून अधिक प्रबोधन पर व्याख्याने दिलेली आहेत.तसेच अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रासंगिक लिखाण ते करत असतात. शिव-शाहू -फुले- आंबेडकर यांची पुरोगामी विचारधारा जपत असलेल्या प्रा.श्री. काकडे यांची शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड ही सामाजिक जाणीवे च्या भावनेतून काम करणाऱ्या एका प्रामाणिक कार्यकर्त्यासाठी मोठी संधी असल्याची भावना खासदार डॉ.निलेश लंके यांनी श्री.काकडे यांच्या निवडीनंतर व्यक्त केली. आहे. तर आज पर्यंत मी अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सतत कार्यरत राहिलेला असून,पक्षाच्या या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व संघटना वाढविण्यासाठी करणार असल्याचे प्रा.काकडे यांनी यावेळी सांगितले,तसेच पक्ष नेतृत्वाने माझ्यावर मोठा विश्वास दाखवून जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष,संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे,प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे,नगर दक्षिणचे खासदार डॉ. निलेश लंके,आमदार व पक्षाचे राज्य सरचिटणीस रोहित दादा पवार यांचे आभारही प्रा.काकडे यांनी मानले आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!