Friday, August 7, 2026

आ.लंघे यांनी घेतली केंद्रीय ग्रामविकास राज्य मंत्र्यांची भेट

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नवी दिल्ली

नेवासा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते विकासाला गती देण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्री कमलेश पासवान यांची भेट घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) अंतर्गत विविध विकास प्रस्तावांवर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीस शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ उपस्थित होते. ग्रामीण भागातील रस्ते अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सर्व ऋतूंमध्ये वाहतुकीस सक्षम व्हावेत, यासाठी आवश्यक विकासकामांना गती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जावे आणि ग्रामीण भागाला सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा पुढेही अविरत सुरू राहणार असल्याचे आ.लंघे यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!