नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील देवसडे येथील मूळ रहिवाशी व आयपीएस अधिकारी ठाणे पोलीस आयुक्त डॉ.पंजाबराव उगले यांना त्यांनी पोलिस दलात केलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांचे हस्ते अतिउत्कृष्ट सेवा पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात श्री.उगले यांना हे पदक बहाल करण्यात आले., खासकर नरेश म्हस्के आदि यावेळी उपस्थित होते.


