Friday, August 21, 2026

शनिशिंगणापूर परिसरात अवैध गावठी कट्टयासह तरूण जेरबंद

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर परिसरात अवैध गावठी कट्टयासह तरूण जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेने कट्टा विक्रीचा प्रयत्न उधळल्याची घटना २० ऑगस्ट रोजी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोसई संदिप दरवडे व पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, अशोक लिपणे, भगवान सानप, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.

दि. २०/०८/२०२६ रोजी पथक शनिशिंगणापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान अवैध शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना गोपनीय बातमीदारा मार्फत इसम नामे अनिल सिताराम सावंत, रा.ब्राम्हणी, ता. राहुरी याचेजवळ गावठी कट्टा असून तो त्याची विक्री करण्यासाठी हॉटेल ब्लू ऑरगॅनिक रसवंती सेंटर जवळ, शनिशिंगणापूर आला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन संशयीताचा शोध घेऊन अनिल सिताराम सावंत (वय ३० वर्षे), रा.ब्राम्हणी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेतले. पंचासमक्ष ताब्यातील आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून ५० हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा व २ हजार रूपये किंमतीचे २ जिवंत काडतुस असा एकुण ५२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यातील आरोपीकडे जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस करता त्याने गावठी कट्टा व जिवंत काडतूस हे गणेश शहाराम शिंदे, रा. वळणपिंप्री, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर (फरार) याचेकडून विकत घेतले असल्याची माहिती सांगीतली.
वर नमूद आरोपीविरूध्द शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. १४१/२०२६ आर्म अक्ट ३/२५ प्रमाणे दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन करीत आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!