Monday, August 24, 2026

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी;धारदार कोयता, कत्ती, चाकू हातात घेऊन दहशत निर्माण करणारे आरोपी जेरबंद

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

धारदार कोयता, कत्ती, चाकू हातात घेऊन दहशत निर्माण करणारे आरोपी एम.आय.डी.सी. पोलीसांनी जेरबंद
केले असून त्यांच्या कडून १ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि हेमंत थोरात यांचे आदेशाने तपासपथकातील अंमलदार हे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोहेकों देविदास खेडकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, अहिल्यानगर ते मनमाड रोडवर साईदिप हॉटेलच्या मागे ०४ इसम हे मोटारसायकलवर त्यांचे हातात धारदार हत्यारे घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. अशी माहिती मिळताच तात्काळ सदर ठिकाणी जाऊन तपास पथकातील अंमलदार यांनी त्यांना ताब्यात घेतले, त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) संस्कार प्रकाश येवलेकर (वय २२ वर्ष), रा. गजानन कॉलनी, नवनागापुर ता.जि. अहिल्यानगर, ईश्वर गणेश नवसुपे (वय २२ वर्ष), रा. गजानन कॉलनी, नवनागापुर, ता.जि. अहिल्यानगर तसेच त्यांचे सोबत दोन विधीसंघर्षित बालके अशी सांगितली दोन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात धारदार कोयता, धारदार कत्ती, धारदार चाकू, दोन मोटारसायकल मिळुन आल्याने वरील सर्व मुद्देमाल दोन पंचासमक्ष जागीच पंचनामा करुन जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं ६७२/२०२६ शस्त्र अधिनियम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन नियुक्तीचे पोहेकों गणेश चौधरी हे करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मा.
अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत थोरात, प्रभारी अधिकारी, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, सफौ. राकेश खेडकर, पोहेकॉ शैलेश रोहोकले, पोहेकों बापुसाहेब फोलाणे, पोहेकों देविदास खेडकर, पोहेकॉ राजु सुद्रीक, पोकों दिपक फुंदे, पोकों नवनाथ दहिफळे, पोकॉ किशोर जाधव, पोकों संपत खेडकर यांचे पथकाने केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!