नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील माळेवाडी येथील गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विजय नाबदे हे होते. प्राचार्य सचिन टाक, उपप्राचार्य सौ. सोनाली आंबेकर, सहशिक्षक, अमोल दरवडे, सहशिक्षिका अश्विनी राजगुरू, योगिता दरवडे, पुजा नाबदे, योगिता कुंढारे, पवार अर्चना, वाघ वैष्णवी यांचेसह शिक्षकेतर कर्मचारी-विद्यार्थी
यावेळी उपस्थित होते.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्याना शिक्षकांच्या विविध जबाबदाऱ्या व प्रशासकीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवा म्हणून विविध उपक्रम राबविण्यात आले.
विद्यार्थी अमित कावळे याने प्राचार्य पदाची तर स्वरा काळे हिने उपप्राचार्य पदाची भूमिका यशस्वी पार पाडली.
यावेळी बोलतांना शाळेचे संस्थापक विजय नाबदे म्हणाले की, “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये अबॅकस हा नवीन अभ्यासक्रम शिकविण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास संतोष गाडेकर, बाबासाहेब क्षिरसागर, नवनाथ साळुंके संतोष सपकाळ , श्रीमती वाघ यांचे सहकार्य लाभले.


