Saturday, September 12, 2026

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ९६व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन;ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा होणार गौरव

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी ऊस उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा “श्री ज्ञानेश्वर ऊस उत्पादकता पुरस्काराने” गौरव करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्त निवास येथे मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रीसद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक (नेवासकर) यांचे शुभहस्ते व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली हा शेतकरी गौरव सोहळा संपन्न होणार आहे.

जिल्हा सहकारी बँक माजी अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, नेवासा येथील श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, अड. देसाई देशमुख व कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होणाऱ्या कार्यक्रमाला सभासद,ऊस उत्पादक शेतकरी,विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!