Wednesday, September 16, 2026

कुकाण्यात डीजे जप्तीची कारवाई;मालकावर गुन्हा दाखल

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

जिल्हाधिकारी यांनी अहिल्यानगर शहर व ग्रामीण भागात दि.१४ सेप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत गणेश उत्सव, नवरात्र उत्सव दसरा उत्सवचे अनुषंगाने डी जे /डॉल्बी वाजवण्यास बंदीचे आदेश जारी केलेले असताना देखील कुकाणा येथे विना परवाना डीजे वाजविल्या प्रकरणी नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल करून डीजे जप्तीची कारवाई केली आहे.

याबाबद पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नेवासा पोलीस ठाणे हद्दीत मा जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील क्र डी सी कार्य ९ ब १ /२१३५/२०२६ दि.१५ सेप्टेंबर २०२६ अन्वये आदेशाने अहिल्यानगर शहर व ग्रामीण भागात दि.१४ सेप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत गणेश उत्सव, नवरात्र उत्सव दसरा उत्सवचे अनुषंगाने डी जे/डॉल्बी वाजवण्यास बंदी असताना देखील कुकाणा-भेंडा जाणारे रोडवर कुकाणा बस स्टँड येथे करण कर्कश आवाजात गाणे डीजेडॉल्बी वर वाजविताना इसम नामें डीजे मालक नबीश बादशहा सय्यद (रा.गंगापूर) व डीजे ऑपरेटर विठ्ठल (रा.जामगाव) असे मिळून आल्याने व त्यांना डीजे डॉल्बी वाजवणे बाबत आवश्यक कागदपत्राची मागणी केली असता त्यांनी कागदपत्र केली नाही ते अनाधिकृतपणे सदर ठिकाणी डीजे वाजवत होते.
त्यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे ७७२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी नेवासा पोलीस ठाणे येथे संबंधित इसमाविरुद्ध कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करून डीजे डॉल्बी वाहनासह जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बंटी काळोखे हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बंटी काळोखे, शाहजी आंधळे, बाबा वाघमोडे, पो कॉ श्रीनाथ गवळी, ज्ञानेश्वर रसाळ नवनाथ शेकडे होमगार्ड बबलू चव्हाण, गंगावणे अरबाज शेख यांनी केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!