Thursday, September 17, 2026

स्व.तुकाराम नवले यांना मुळा एज्युकेशन सोसायटीकडून श्रद्धांजली

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे माजी विश्वस्त स्व.तुकाराम नवले यांना मुळा एज्युकेशन सोसायटी,
शारदाताई फाउंडेशन, यश ग्रुप कडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे विश्वासू सहकारी आणि गेल्या ५० वर्षांपासून गडाख परिवाराशी स्नेहाचे व जिव्हाळ्याचे नाते जपणारे ज्येष्ठ नेते स्व. तुकाराम काका नवले (नेवासा बु.) यांचे दुःखद निधन झाले. या निधनाबद्दल नेवासा तालुक्यातून सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख तसेच मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोबत नेवासा परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात हिरिरीने सहभागी होत समाजहितासाठी मोलाचे योगदान दिले.
त्यांनी मुळा एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणून अनेक वर्ष काम केले. सामाजिक कार्यकर्ते, सातत्याने हित जपणारे व मा खा यशवंतराव गडाख अत्यंत जिवलग मित्र, सहकारी, प्रेमळ स्वभावाचे, सुसंस्कृत नेतृत्व हरपले. त्यांच्या कार्याची, साधेपणाची आणि गडाख परिवाराशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांची आठवण सदैव मनात राहील. मुळा एज्युकेशन सोसायटी, शारदाताई फाउंडेशन, यश ग्रुप आणि कृषि महाविद्यालयात स्व. तुकाराम काका नवले यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मुळा एज्युकेशनचे सर्व अधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व इतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!