Saturday, September 26, 2026

सत्ता असो वा नसो, आम्ही कायम जनतेबरोबर-माजी मंत्री शंकरराव  गडाख

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

सत्ता असो किंवा नसो, आम्ही कायम जनतेबरोबर आहोत. सदैव जनतेच्या सेवेत राहून काम करत आलो असून, यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहू, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका व महालक्ष्मी हिवरे शिवारातील श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थानच्या सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण मा मंत्री शंकरराव गडाख व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात गडाख बोलत होते.
 ह.भ.प. सुखदेव महाराज मुंगसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक भवनाच्या उभारणीसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये, तर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून १५ लाख रुपये, असा एकूण ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार सदाशिव लोखंडे, सरपंच अनिलराव घुले, माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, ह.भ.प. प्रदीप महाराज वाघमोडे, ह.भ.प. बाबासाहेब गडकर, ह.भ.प. सोपान महाराज होंडे, शिवसेना नेते रामदास गोल्हार, सुरेशराव डिके, माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र म्हस्के, माजी सभापती कारभारी चेडे, महालक्ष्मी हिवरेचे सरपंच भगवानराव गंगावणे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम, देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, माका गावचे सरपंच अनिलराव घुले, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, मुळा कारखान्याचे संचालक एकनाथराव जगताप, संचालक लक्ष्मण आबा पांढरे, चेअरमन भरत होंडे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, महेशराजे काळे, नामदेव घोडेचोर, दत्ता पाटील मुंगसे, दिनेश गुगळे, उद्योजक शिवाजीराव उबाळे, मालोजी गटकळ, रामेश्वर गोयकर, जनाभाऊ तांबे, पांडुरंग रक्ताटे, पावन महागणपती देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंगसे, सलीमराजे शेख, एकनाथ भुजबळ, नवनाथ महाराज मुंगसे, माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, मल्हारी सांगळे, पत्रकार युनूस पठाण यांच्यासह पावन महागणपती देवस्थानचे सर्व विश्वस्त, ग्रामस्थ व भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देडगाव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरे व तेलकुडगाव येथील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकार्पण सोहळ्यात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती भगवानराव गंगावणे यांनी केले, तर अशोकराव मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!