Tuesday, November 3, 2026

प्रा.संतोष सोनवणे यांच्या वाढदिवसा निमित्त बालग्राम अनाथालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

गेवराई/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा.संतोष सोनवणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत बालग्राम ता.गेवराई येथील येथील अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या सहारा अनाथालय परिवारास भेट देत येथील मुलांना खाऊ -बिस्किटे वाटप करत आपला वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमाने द्विगुणीत केला .

आई संस्था संचालित येथील सहारा अनाथालय परिवाराच्या माध्यमातून (बालग्राम) वय वर्ष वयोगट ६ ते १८ वयातील अनाथ मुलांची निवासी सुविधा उपलब्ध करत शैक्षाणिक खर्च लोकसहभागातून गेल्या २० वर्षापासून निराधार शंभरच्या वर विद्यार्थ्यांना सांभाळण्याचे त्यांचे भविष्य घडविण्याचे काम बालग्राम परिवार करत आहे .

‘बालग्राम ‘संस्थेस मदतीचे आवाहन…

बालग्राम संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांच्या निवासाची व शिक्षणाची सुविधा देत त्यांचा सांभाळ करण्याचे काम संस्था करत आहे.हे कार्य आपल्या सर्वांच्या लोकसहभागातून व सहकार्यानेच घडत आहे .
‘यांना घडवितांना त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी ‘ सुजाण नागरीक घडवितांना आम्हाला तुमच्या एक हात मदतीची गरज आहे . तरी आपण बालग्राम परिवारास भेट देत अन्नधान्य -आर्थिक मदत करत अनाथ चिमुकल्यांची मुलांची गोड करावी.
–संतोष गर्जे
बालग्राम ,सहारा अनाथालय परिवार, ता.गेवराई

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!