Tuesday, November 10, 2026

विद्यार्थ्यांसाठी किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन;१९ स्पर्धकांचा सहभाग

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि ग्राम सुधार समितीचा पुढाकार…

पाथर्डी/प्रतिनिधी

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि ग्राम सुधार समितीच्या पुढाकाराने हनुमान टाकळी येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेत १९ स्पर्धकांचा सहभाग घेऊन या स्पर्धेला प्रतिसाद दिला.

दिवाळी हा कुटुंबीयांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा, विविध फराळाचे पदार्थ तयार करून एकमेकांना आनंद वाटण्याचा सण आहे.या आनंदोत्सवात फटाक्यांचा समावेश करून आपण पर्यावरणाचे प्रदुषण करतो. कष्टाने कमावलेल्या पैशाची क्षणात राखरांगोळी होते. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून हनुमान टाकळी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि ग्राम सुधार समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले होते. खुपचं उत्सुर्त प्रतिसाद मिळाला तब्बल १९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांनी स्वतः फटाके न फोडण्या बरोबरच आपल्या कुटुंबीयांना, मित्र परिवाराला आणि परिसरातील नागरिकांनाही फटाके मुक्त दिवाळी करण्यासाठी आवाहन करून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणारी किल्ले ऊभे करून स्वच्छंदी बालपणाचा मनमुराद आनंद लुटला.

या स्पर्धेत गौरव संजय बावणे, समर्थ श्रीराम बर्डे, सार्थक शंकर बर्डे, ओम भरत बर्डे, कार्तिक उद्धव बर्डे, आयान व काजल अन्सार सय्यद,स्वराज योगेश गायकवाड,रूद्रा भाऊराव ससे , सुरज बाबासाहेब ससे,प्रमोद बापू कोठे, सार्थक संजय कोठे, महेश रामदास खटावकर, आयुश अतुल बर्डे, आलीया नुरमहंमद शेख, श्रावणी गणेश दगडखैर, सार्थक भाऊसाहेब बावणे, सार्थक रामेश्वर जगताप,मोहीत रमेश मरकड, भार्गवी प्रविण काजळे, पार्थ लक्ष्मण बलफे या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
विनोद काजळे व अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी सर्व किल्ल्यांचे परीक्षणं केले.

*किल्ल्या पुढील रांगोळीतील संदेश….
१) कुठे महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात बांधणार होते,आणि कुठे आता महाराजांच्या सह्याद्रीचा घात
करायला निघाले, दुर्दैव…

२) झाडं तोडून विकास होत असेल तर त्या विकासाची किंमत कोण मोजणार!
-माधुरी योगेश गायकवाड

*गेल्या वर्षी ५ हजाराची फटाके फोडले होते. यावर्षी फक्त २०० रूपये.
-बाबासाहेब ऊर्फ भाऊराव ससे.*

मुलांनी स्वतः होऊन फटाके फोडायची नाहीत म्हणून सांगितल्या मुळें एकही रूपयांचे फटाके घेतले नाहीत.
-बापू कोठे

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!