Tuesday, November 17, 2026

महाराष्ट्र राज्यात ३४ लाख ८३ हजार ९४० कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचनांची कामे होणार

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/सुखदेव फुलारी

महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडून जलशक्ती अभियान-कॅच द रेन २०२६० अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या ३५ जिल्हे ग्रामीण भाग व २९ महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण ३४ लाख ८३ हजार ९४० कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचनांची कामे करायवयची आहेत.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या
निर्देशानुसार संपूर्ण देशात ‘जलशक्ती अभियानः कॅच द रेन’ २०२६ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार येत्या मे २०२७ पर्यंत महाराष्ट्र राज्यास एकूण ३४ लाख ८३ हजार ९४० कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचना (AWRS) उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. उद्भवलेल्या अल निनो परिणामातून दुष्काळी परिस्थिती पाहता जलसंधारण व कृत्रिम भूजल पुनर्भरण कामे युद्धपातळीवर होणे आवश्यक आहे.
राज्य शासनाच्या दि. २० मे २०२६ च्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय व महानगरपालिका स्तरावरील समित्या गठीत केल्या असून, या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही आपल्या सर्वांची प्रमुख जबाबदारी आहे. राज्याच्या या एकूण ३४ लाख ८३ हजार ९४० लक्ष्याचे शास्त्रीय पद्धतीने सर्व जिल्हे व २९ महानगरपालिकांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचे नियंत्राणाखाली पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत ‘रिचार्ज शाफ्ट्स’ (Recharge Shafts), ‘हायड्रोलिक फॅक्चरिंग’ (Hydraulic Fracturing) आणि इतर तांत्रिक भूजल पुनर्भरणाची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत.
ग्रामविकास विभागा मार्फत गाव तलाव, तळी पुनर्जीवन आणि मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात शोषखड्डे व जलसंधारणाची कामे करावीत.
मृद व जलसंधारण विभागामार्फत सिमेंट नाला बंधारे (CNB), मातीचे बंधारे व पाणलोट क्षेत्र विकासावर भर द्यावा.
कृषी विभागामार्फत शेततळी, सिंचन विहिरी पुनर्भरण आणि शेतकरी स्तरावरील जलसंधारणाला चालना द्यावी.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ग्रामीण भागातील आपल्या अधीनस्थ सर्व जुन्या व नवीन शासकीय इमारतींवर (शाळा, दवाखाने, कार्यालये) छतावरील पाणी साठवण यंत्रणा Roof Top Rain Water Harvesting (RTRWH) व शोषखड्डे बसवण्यावर भर द्यावा.
वन विभागामार्फत वनपरिसरात तसेच ग्रामीण भागात ‘वनराई बंधारे’ (Vanrai Bandhara), सिमेंट नाला बंधारे आणि तळी यांसारख्या माध्यमांतून भूजल पुनर्भरणाची कामे करावीत.
जलसंपदा विभागामार्फत प्रमुख तलाव, धरणे आणि नदी पुनर्जीवनाच्या कामांमध्ये समन्वय साधावा.

महानगरपालिका आयुक्तांनी शहरी भागात सर्व नवीन बांधकाम परवानग्यांमध्ये (Building Bye-laws) छतावरील पाणी साठवण यंत्रणा (रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग) बसवणे अनिवार्य असल्याची कडक अंमलबजावणी करावी आणि या नवीन संरचनांची नोंद लक्ष्यापोटी करावी.
नगरविकास, पाणी पुरवठा (WSSD) व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) समन्वयाने सर्व शासकीय इमारती व सार्वजनिक ठिकाणी Roof Top Rain Water Harvesting (RTRWH) आणि शोषखड्डे तात्काळ पूर्ण करावेत.

*शासनाचे विभागांना दिलेले जिल्हा निहाय लक्ष्य…

——————————————-
अ.क्र.–जिल्हा–एकूण सुधारित लक्ष्य–भूजल सर्वेसक्षण–ग्रामविकास–मृद व जलसंधारण–कृषी—सार्व.बांधकाम–वन—जलसंपदा
——————————————–
१)अहिल्यानगर–१,५८,६५६–३९,६६४–३१,७३२–२३,७९८–२३,७९८–१५,८६६–१५,८६६–७,९३२

२) अमरावती–१,२३,८९८–३०,९७४
–२४,७८०,१८,५८४– १८,५८४–
१२,३९०–१२,३९०–६,१९६

३)अकोला–५५,९८४–१३,९९६–
११,१९६–८,३९८–८,३९८–५,५९८
–५,५९८– २,८००

४)छ.संभाजीनगर–१,२३,९४४–३०,९८६–२४,७८८–१८,५९२–१८,५९२–१२,३९४–१२,३९४–६,१९८

५)बीड–१,१०,९९४–२७,७४८–२२,१९८–१६,६५०–१६,६५०–११,१००
–११,१००–५,५४८

६) बुलढाणा–१,१६,६५८–२९,१६४–
२३,३३२–१७,४९८–१७,४९८–११,६६६–११,६६६–५,८३४

७)भंडारा–४२,७००–१०,६७६–८,५४०–६,४०६–६,४०६–४,२७०–४,२७०
–२,१३२

८)चंद्रपूर–१,१२,१३२–२८,०३४–२२,४२६–१६,८२०–१६,८२०–११,२१४–११,२१४–५,६०४

९)धाराशिव–८५,०२६–२१,२५६–
१७,००६–१२,७५४–१२,७५४–८,५०२–८,५०२–४,२५२

१०)धुळे–८६,८२२–२१,७०६–१७,३६४–१३,०२४–१३,०२४–८,६८२–
८,६८२–४,३४०

११)गडचिरोली–१,०१,६८६–२५,४२२
–२०,३३८–१५,२५२–१५,२५२–
१०,१६८–१०,१६८– ५,०८६

१२) गोंदिया–४९,५०६–१२,३७६–
९,९०२– ७,४२६–७,४२६–४,९५०–
४,९५०–२,४७६

१३) हिंगोली–६७,२९०–१६,८२२–
१३,४५८–१०,०९४–१०,०९४–६,७३०–६,७३०–३,३६२

१४) जळगाव-१,३२,४८६– ३३,१२२
–२६,४२८–१९,८७२–१९,८७२–
१३,२४८–१३,२४८– ६,६२६

१५) जालना–८३,११६–२०,७८०–
१६,६२४–१२,४६८–१२,४६८–८,३१२–८,३१२– ४,१५२

१६) कोल्हापूर–८०,०३०–२०,००८–
१६,००६–१२,००४–१२,००४–८,००४–८,००२–४,००२

१७) लातूर–७६,२६४–१९,०६६– १५,२५२–११,४४०–११,४४०–७,६२६–७,६२६– ३,८१४

१८) मुंबई–१२,६८४–३,१७२–२,५३६
–१,९०२–१,९०२–१,२६८–१,२६८–६३६

१९) नांदेड–१,२२,०६६–३०,५१६–
२४,४१४–१८,३१०–१८,३१०–१२,२०६–१२,२०६– ६,१०४

२०) नागपूर–८८,०००–२२,०००–
१७,६००–१३,२००–१३,२००–८,८००–८,८००– ४,४००

२१) नंदुरबार–४६,००२–११,५००–
९,२००–६,९००–६,९००–४,६००–
४,६००–२,३०२

२२) नाशिक–१,६९,५००–४२,३७६–
३३,९००–२५,४२६–२५,४२४–१६,९५०–१६,९५०–८,४७४

२३) पालघर–३०,७९२–७,६९८–
६,१५८–४,६१८–४,६१८–३,०८०–
३,०८०–१,५४०

२४) परभणी–८०,०८०–२०,०२०–
१६,०१६–१२,०१२–१२,०१२–८,००८–८,००८– ४,००४

२५) पुणे–१,२६,७५८–३१,६९०–
२५,३५२–१९,०१४–१९,०१४–१२,६७६–१२,६७६–६,३३६

२६) रायगड–५९,१५८–१४,७९०– ११,८३२–८,८७४–८,८७४–५,९१६–
५,९१६–२,९५६

२७)रत्नागिरी–५५,९९८–१४,०००–
११,२००–८,४००–८,४००–५,६००
–५,६००–२,७९८–

२८) सांगली–९६,२०६–२४,०५२–
१९,२४२–१४,४३०–१४,४३०–९,६२०–९,६२०– ४,८१२

२९) सातारा–९५,१५६– २३,७९०–
१९,०३२–१४,२७४–१४,२७४– ९,५१६–९,५१६– ४,७५४

३०) सिंधुदुर्ग–३०,५७६–७,६४४–
६,११६–४,५८६–४,५८६–३,०५८
–३,०५८–१,५२८

३१) सोलापूर–१,३७,०२६–३४,२५६
–२७,४०६–२०,५५४–२०,५५४–
१३,७०२–१३,७०२–६,८५२

३२) ठाणे– ३४,७७६–८,६९४– ६,९५६–५,२१६–५,२१६–३,४७८–
३,४७८– १,७३८

३३) वर्धा–६४,९१६–१६,२३०– १२,९८४–९,७३८–९,७३६–६,४९२–
६,४९२–३,२४४

३४) वाशिम–५१,८२२–१२,९५६–
१०,३६४–७,७७४–७,७७४–५,१८२–
५,१८२– २,५९०

३५) यवतमाळ–१,५३,६१६– ३८,४०४–३०,७२४–२३,०४२–२३,०४२–१५,३६२–१५,३६२– ७,६८०
————————————————
एकूण–३०,६२,३२४–७,६५,५८८–
६,१२,४७२–४,५९,३५०–४,५९,३४६
–३,०६,२३४–३,०६,२३२–१,५३,१०२
———————————————-

*महानगरपालिका क्षेत्रातील सुधारित लक्ष्य वाटप असे…

अहिल्यानगर महानगरपालिका (३,३००),मुंबई महानगरपालिका(६९,०००),पुणे महानगरपालिका(४६,६००),नागपूर महानगरपालिका(३३,०००),ठाणे महानगरपालिका(३४,४००),पिंपरी-चिंचवड महानगरपालिका(३५,०००),नाशिक महानगरपालिका(१७,८००),कल्याण-डोंबिवली महानगरपालिका(१३,६००),वसई-विरार महानगरपालिका(१३,०००),छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका(१४,४००),नवीमुंबई महानगरपालिका(१२,२००),सोलापूर महानगरपालिका(९,०००),मीरा-भाईंदर महानगरपालिका(१०,०००),भिवंडी-निजामपूर महानगरपालिका(७,२००),अमरावती महानगरपालिका(५,६००),नांदेड-वाघाळा महानगरपालिका(५,०००),कोल्हापूर महानगरपालिका(४,८००),उल्हासनगर महानगरपालिका(४,४००),सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका(४,२००),मालेगाव महानगरपालिका(४,८००),जळगाव महानगरपालिका(४,०००),अकोला महानगरपालिका(३,८००),लातूर महानगरपालिका(३,२००),धुळे महानगरपालिका(३,६००),चंद्रपूर महानगरपालिका(३,२००),परभणी महानगरपालिका(२,८००),इचलकरंजी महानगरपालिका(२,७००),पनवेल महानगरपालिका(५,६००),जालना महानगरपालिका (२,८५४) असे ३ लाख ७९ हजार ०५४ कामे शहरी (महानगरपालिका) भागात करायवयची आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!