अयोध्या दि.२२ जानेवारी २०२४
अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्नझाली.या सोहळ्याकरिता नरेंद्र मोदींनी ११ दिवसांचा उपवास केला.रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापने नतंर अहमदनगर जिल्ह्यातील बेलापुर येथील आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी तीर्थ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपवासाची सांगता केली.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या हातून प्रभू रामाचे चरणामृत प्राशन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला ११ दिवसाचा उपवास सोडला.पंतप्रधान मोदींना उपवसाचे (अनुष्ठानाचे) महत्व सांगताना स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले,
आम्ही महापूरूषांशी विचारविमर्श करून लिहलं होत की, तुम्हाला फक्त ३ दिवसाचा उपवास करायचा आहे. पण आपण ११ दिवसाचा संपूर्ण उपवास केला. त्यांनी (पंतप्रधानांनी) ११ दिवस अन्नत्याग केल्याचे गोविंद देवगिरी महाराज यांनी सांगितले.
भारतीय संस्कृतीत मुळ शब्द आहे तप तप इती. आमचे पूज्य गुरुदेव परमगुरू सांगायचे कांचीचे परमाचार्य महाराज तपश्चर्या. मी जेव्हा त्यांना भेटायचो, ते सांगायचे तपश्चर्या. तपची कमी झाली आहेत आणि त्या तपाला साकार होताना आम्ही तुमच्यात (पंतप्रधानांमध्ये) पाहिलं. मला ही परंपरा पाहून एकाच राजाची आठवण येत, ज्याच्या अंगी या सर्व गोष्टी होत्या. त्या राजाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. यावेळी गोविंद देवगिरी महाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू देखील म्हटले होते.