Wednesday, February 21, 2024

अपयशाने खचू नका-सीए तेजश्री दरवडे

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करा. आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवा निश्चित यश मिळते असे प्रतिपादन सीए तेजश्री दरवडे यांनी केले.

कुकाणा येथील ललितशेठ भंडारी मित्र मंडळाच्या वतीने सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तेजश्री दरवडे व उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेले विकास कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. लताताई अभंग होत्या. या वेळी वर्षा भंडारी, सुरेखा देशमुख, सुनीता सूर्यवंशी, सुगंधा देशमुख, संगीता चौधरी, सुनिता देशमुख, दीपाली सूर्यवंशी, सीमा भंडारी उपस्थित होत्या.
‘समता’चे अध्यक्ष विठ्ठलराव अभंग, महेशराजे देशमुख, ललित भंडारी, विशाल उगले यांची भाषणे झाली.
कृषी अधिकारी राधाकृष्ण पाटील, जव्हार भंडारी, गणेश आले, सुभाष भागवत, सुभाष चौधरी, दिलीप सूर्यवंशी, मुन्ना चोरबेले, मनोज हुलजुते, सिद्धार्थ कावरे, जितेंद्र देशमुख, एकनाथ कावरे उपस्थित होते.
शकूर शेख यांनी सूत्रसंचालन केले तर आभार कुलदीप देशमुख यांनी मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!