Wednesday, May 13, 2026

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचा ३७ वा पदवीप्रदान समारंभ सोमवारी (ता.२९) आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले व नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  विलास शिंदे

यांना उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली.यावेळी कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर  या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस ऑनलाईन उपस्थित असणार आहेत. याप्रसंगी ट्रस्ट फॉर अँडव्हान्समेंट ऑफ अँग्रीकल्चरल सायन्सेस (टास) चे अध्यक्ष,

भारत सरकारच्या कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे माजी सचिव तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. आर.एस. परोदा हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करणार आहेत.

पदवीदान समारंभात गेल्या वर्षातील विविध विद्याशाखांतील सहा हजार ८९५ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती रमेश बैस यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!