नेवासा
नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील श्रीराम हायस्कूलच्या १९८२ सालच्या इयत्ता १० वीच्या वर्गातील सवंगडी तब्बल ४१ वर्षानी एकत्र आले.
रविवार दि.२८ रोजी माळी चिंचोरा येथील चोवीस बाय सात फूड माल च्या सभागृहात अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक समाजाचे भानसहिवरे येथील श्रीराम हायस्कूलच्या १९८२ सालच्या इयत्ता १० वीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा “जुने सवंगडी स्नेहमिलन समारंभ” संपन्न झाला.यावेळी विद्यालयाचे माजी शिक्षक व माजी विद्यार्थी मोठ्या सख्येने उपस्थित होते. तब्बल ४१ वर्षानी सर्व मित्र एकत्र आल्याने सर्वानी आनंद व्यक्त केला.
विद्यालयाचे माजी शिक्षक अशोक कटारिया, रामनाथ काकडे , विजय
ढोले,बबन कातकडे,धोंडीराम ढगे,शिवाजी वाबळे,श्रीमती पुष्पा साळुंखे, रामकिसन घुले उपस्थित होते.
श्रीराम विद्यालयाचा माजी विद्यार्थी व सुप्रसिद्ध कवी बाबासाहेब सौदागर यांनी आपल्या खुमासदार पद्धतीने
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमास रंगत आणली.तब्बल ४१ वर्षांनी एकत्र येत सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकमेकांशी संवाद साधत पुन्हा भेटण्याचा निश्चय करीत निरोप घेतला.
कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी डॉ.गोविंद साळुंके, कैलास धानापुणे,कारभारी पेहेरे, अतुल चेंगडे,जयकुमार चेंगडे,योसेफ मकासरे,भाऊसाहेब चिंधे,सुभाष लवांडे, नानासाहेब गर्जे, सौ. किर्ती साळुंके,सुनंदा विधाटे,विजया निकम, कल्पना चव्हाण,कल्पना बोरा यांनी विशेष परिश्रम घेतले.