माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या 40 जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. या 40 जागांमध्ये कोणाला कोणता मतदारसंघ हे जवळपास निश्चित झालं आहे.
मात्र अजूनही 8 जागांवरून तिढा कायम आहे. या 8 जागांवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाटाघाटी सुरु आहेत. त्यातच प्रकाश आंबडेकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचाही
महाविकास आघाडीत समावेश असल्याने, त्यांच्या पक्षांनाही एक एक जागा देण्यात येणार आहे.महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास फायनल झाल्याचं सांगण्यात आलं.
तर उर्वरित 8 जागांचा तिढा अद्याप कायम आहे. या जागांमध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे जिथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दावा करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील बैठकीत हा तिढा सुटला नाही, तर हा मुद्दा तिन्ही पक्षाच्या नेतृत्वासमोर मांडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या मविआ मधील समावेशनंतर
वंचित बहुजन आघाडी सुद्धा जागा वाटपासंदर्भात आपली भूमिका 2 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत ठेवणार आहे.वंचितसाठी अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मविआमध्ये या
एकाच जागेवर समाधानी राहणार की आणखी जागांची मागणी करणार हे पाहावं लागेल. वंचित बहुजन आघाडीकडून अधिक जागांची मागणी झाल्यास हा तिढा आणखी वाढू शकतो.तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला
सोडली गेली आहे अशी माहिती समोर येत आहे पण अंतिम निर्णय हा बैठकीत घेण्यात येईल.राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीत आतापर्यंत झालेली चर्चा आणि तिढा असलेल्या एकूण जागा
काँग्रेस – 14
ठाकरे गट – 17 (15 + 2) (यामध्ये वंचित 1 आणि स्वाभिमानीला 1 जागा)
राष्ट्रवादी काँग्रेस -9
तिढा असलेल्या जागा – 8