भेंडा : नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील मनोज निवृत्ती जाधव यांना विमा क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळ यांचा सन 2024 या वर्षाचा MDRT , जागतिक विमा परिषद यांचा बहुमान दुसऱ्यांदा मिळाला आहे.
पुणे येथील हाँटेल सिझन्स बॅन्कवेट येथे हा सोहळा पार पडला आहे.भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरीष्ठ मंडल प्रबंधक श्री मोघे सर यांच्या हस्ते जाधव यांना सन्मानित करण्यात आले आहे.
शिरुरचे शाखा प्रबंधक कपील माळवी व विकास अधिकारी प्रमोद जासुद यांचे मार्गदर्शन लाभले आहे.MDRT मिटींग जून 2024 ला कॅनडा येथे होणार आहे.जाधव यांना पुरस्काराने सन्मानित मिळाल्यानंतर
उस्थळ दुमाला गावचे सरपंच किशोर सुकाळकर ,प्रविण सानप, निखिल वाघ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.जाधव यांना याआधी 2023 साली MDRT सन्मान मिळाला होता.