Saturday, December 21, 2024

मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणूक लढवावी, आमचा पाठिंबा,या नेत्यांनी दिली ऑफर

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे वंचितचे राष्ट्रीय

अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही सविस्तर माहिती दिली. मनोज जरांगे यांना आम्ही राजकीय मेसेज पाठवलाय.

ही राजकीय लढाई आहे. त्यासाठी तुम्ही जालनामधून अपक्ष निवडणूक लढवा. एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवल्यास त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी. त्यासाठी

आमचा पाठिंबा असेल, असा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवलाय, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  ओबीसीच्या ताटातले आरक्षण टिकणार नाही. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे. शिंदे आयोगाच विशेष

अधिवेशन बोलावलं आहे. लोकसभेच्या आधी एक अधिवेशन घ्याव लागेल. हे फसव राजकारण आहे का? कळत नाही. मनोज जरांगे पाटील यांना आम्ही निरोप दिला आहे, की त्यांना हा लढा शरीराचा त्याग करून

लढण्याचा अर्थ नाही. उपोषणावेळी जागृती करायची होती ती केली. महिन्यात लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःहून जालन्यात स्वतंत्र्य लढाई लढली पाहिजे. गरीब

मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत गेले तर लढता येणार नाही. आम्ही आज सूचना पाठवल्या आहेत. त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे.

मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. सरकारने त्यांना अधिवेशनात मागण्या मान्य करण्याचं अश्वासन दिले. लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत.

त्याआधी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्य सरकारला अधिवेशन घ्यावं लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!