Wednesday, February 11, 2026

सोमनाथ कचरे यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील युवा कार्यकर्ते व पत्रकार सोमनाथ कचरे यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे.

नेवासा येथे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके यांचे उपस्थितीत नेवासा येथे झालेल्या पक्षाचे मेलाव्यात सोमनाथ कचरे यांनी प्रवेश केला.श्री.कचरे हे कुकाणा येथील शेतकरी कुटूंबातील तरुण असून ते पदवीधर आहेत. त्यांचा कुकाणा येथे व्यवसाय, पत्रकारिता व सामाजिक कार्य चालू केले. वक्तृत्व, संघटन कौशल्य असल्याने कुकाणा ग्रामपंचायतमध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या पत्नी सौ.शुभांगी कचरे या उपसरपंच पदी विराजमान झालेल्या आहेत.सामाजिक काम,पत्रकारिता क्षेत्रातील व मानवाधिर संघटनेत महत्वाची पदे ते भूषवित आहेत. मोठा जनसपंर्क मित्र परिवार असल्याने त्यांना आम आदमी पार्टीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

*सोमनाथ कचरे:- देशात आम आदमी पार्टीचं दिल्ली व पंजाब मध्ये चांगल्या पद्धतीचे काम चालू आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे पक्षप्रमुख अरविंद केजिरवाल यांना सामाजिक प्रश्नाची जाणीव असल्याने सामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष म्हणून आपची ओळख आहे. त्याच बरोबर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याचे प्रश्न जशाचे तसेच आहेत,त्या मुळे आपच्या विचारधारेवर प्रभावीत होऊन पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी पदाधिकारी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचा माणस आहे.
-सोमनाथ कचरे
युवा कार्यकर्ता,कुकाणा

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!